ज्या आईने मुलांना शेतात कष्ट करून वाढवलं, शिक्षण दिलं, मोठ केलं त्या आईला तिच्या वाढदिवशी अभिनेता असलेल्या मुलाने सरप्राईज म्हणून चक्क हेलिकॉप्टर मधे आकाशात स्वतः मालक असलेल्या ‘केक्स इलेव्हन’ या केक फॅक्टरी मधील केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच जवळपास एक कोटी रुपये किंमत असलेले घर खरेदी करून आई वडिलांना गिफ्ट दिले. फक्त एवढ्यावरच न थांबता लगेचच आलेल्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त स्त्री शैक्षणिक संस्थेच्या कै. श्री वसंतराव वैद्य प्रशाला राजेंद्र नगर, पुणे येथील सहा अनाथ व गरीब मूली दत्तक घेवून त्यांचा पुढील सर्व खर्च व शैक्षणिक जबाबदारी उचलली आहे. त्या अभिनेत्याने यापुर्वीच पाच मूली दत्तक घेतल्या होत्या म्हणजेच अशा अकरा मूली दत्तक घेवून त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. या सामाजिक बांधीलकी मुळे सुभाष यादव या मराठी अभिनेत्याचे कौतुक होत आहे.

या शाळेत शिकणाऱ्या या मुलींच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व आर्थिक अडचणींमुळे त्यांना मागील काही वर्षांचे शैक्षणिक शुल्क भरणे शक्य झाले नव्हते, त्यामुळे त्यांचे शिक्षण थांबण्याची वेळ आली होती.या गोष्टीची कल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री डांगे यांनी यादव यांना दिल्यावर त्यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेत त्या विद्यार्थिनींचे थकित शुल्क भरून त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले तसेच थेट दत्तक घेवून यापुढील काळातील शैक्षणिक शुल्क,शैक्षणिक साहित्य,कपड़े,किराणा, मेडीकल या सर्व गोष्टींची जबाबदारी यादव यांनी स्वीकारली आहे.एका मराठी अभिनेत्याने सामाजिक भान जपत विद्यार्थिनी दत्तक घेण्याचा उपक्रम राबवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढ़दिवस साजरा केला याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नीता रजपूत यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. आईच्या वाढदिवसानिमित्त आई वडिलांना सरप्राइज म्हणून थेट हेलीकॉप्टर मधेच आकाशात वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सुभाष ला सूचली. कुठलीही पूर्वकल्पना न देता थेट हेलीकॉप्टर च्या दारातच उभे केल्यानंतर आई वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला व आनंदही झाला. संपूर्ण पुणे शहर हेलीकॉप्टर मधून पाहून वरच केक़ कट करुन वाढदिवसदेखील हटके पद्धतीने साजरा झाला. त्यानंतर पुणे शहरामध्ये जवळपास एक कोटी रूपयांचा नवा कोरा फ्लॅट आई-वडिलांना गिफ्ट केला.फेसबूक वर पोस्ट करत सुभाष ने आपल्या या सर्व भावना व्यक्त केल्या आहेत.

सुभाष यादव हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून शाळेपासूनच अभिनय व एकपात्री विनोदी स्किट ची आवड़ पुढे पूर्ण वेळ करीयर कडे घेवून गेली. ‘कॉमेडी तड़का’ या एकपात्री कार्यक्रमामुळे तो सगळी कड़े प्रसिद्धीच्या झोतात आला.’रोल नंबर अठरा’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पदार्पण केल्यानंतर आणखी तीन चित्रपट कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर व चित्रपटगृहे सुरू झाल्यावर प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. अभिनय क्षेत्राबरोबरच व्यवसायाची प्रचंड आवड असल्यामुळे सुभाष ने ‘केक्स इलेव्हन’ या भव्य केक ब्रँडची सुरुवात करून धडपडणाऱ्या तरुणाईला सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर या फ्रॅंचाईजी व्यवसायाची यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. व्यवसायाच्या सुरुवातीलाच यातून होणाऱ्या नफ्यातील 11 टक्के रक्कम गरीब व अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे त्याने जाहीर केले होते. दिलेला शब्द खरा करून दाखवत समाजात एक वेगळाच आदर्श सुभाषने निर्माण केला आहे.भारताबाहेर देख़ील हा व्यवसाय पोहचवन्यासाठी त्याचे प्रयत्न सूरु आहेत.