सध्या बरेचसे कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त नसली तरी घरी राहून पावसाचा आनंद मनमुरादपणे लुटताना दिसत आहेत. महाराष्ट्र शासनाने शूटिंगच्या निर्बंधाला शिथिलता दिल्याने सर्व मालिकांचे आणि चित्रपटाचे शुटिंग पूर्ववत झालेले दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या जोमाने सर्व कलाकार आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी लवकरच रुजू झालेले दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा देखील सध्या आपल्या घरीच राहून निसर्गाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ चांदेकर पुण्याचा असला तरी सध्या तो गोरेगाव येथे वास्तव्यास आहे.

सिद्धार्थ चांदेकर गोरेगाव येथील त्याच्या घराच्या खिडकीतून जंगलाची मौजमजा त्याला मुक्तपणे अनुभवायला मिळत आहे. जंगलाच्या जवळच असलेल्या त्याच्या घराच्या खिडकीतून बऱ्याच वन्य प्राण्यांचे दर्शन त्याला घडले आहे. बिबट्या, काळवीट, सरडा या प्राण्यांचे सुंदरसे फोटो त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. सिध्दार्थच्या या फोटोंवरून तो अगदी प्रोफेशनल फोटोग्राफर असावा असेच मत अनेकांनी व्यक्त करत त्याचे कौतुक केले आहे. एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफी काय असते हे या फोटोंवरून लक्षात येईल. अर्थात हे सर्व मला पाहता आलं याच कारण म्हणजे आपण त्यांच्या घरात शिरलोय हे सत्य त्याने कबुल केले आहे. बिबट्याचा एक सुंदर फोटो शेअर करून सिध्दार्थने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की…”आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. “तुमच्यामुळे झालंय हे” असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याच्या नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे….”

सिद्धार्थ चे हे वाईल्ड लाईफ फोटो पाहून तू कोणत्या जंगलात राहतो असे अनेकांनी विचारले आहे. सिद्धार्थ त्याच्या आई आणि पत्नी मितालीसोबत पुण्यातच स्थायिक असला तरी कामानिमित्त या दोघांना मुंबईत बऱ्याचदा यावे लागते त्याच अनुषंगाने हे दोघेही गोरेगाव येथील आरे जंगलाच्या आसपास राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरे जंगलाचा हा अप्रतिम नजारा सिध्दार्थच्या घराच्या बाजूलाच असल्याने त्याने हे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अगदी मराठी सृष्टीतील सहकलाकारांनी देखील या फोटोंची दखल घेतलेली पाहायला मिळत आहे. बिबट्या, सारडा आणि काळवीट हिरव्यागार गर्द झाडीत लपलेले हे प्राणी अतिशय सुंदर दिसत आहेत. मीडियावर देखील त्याच्या या फोटोंची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.