मुळात ते माझ्या आईचे मिस्टर आहेत पण ते माझे वडील नाहीयेत… सिद्धार्थ बाप मुलाच्या केमिस्ट्रीबद्दल पहा काय म्हणतो
५ जानेवारी रोजी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर , सायली संजीव आणि नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ओले आले’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकार मंडळींनी प्रमोशनसाठी कंबर कसली आहे. नुकतेच सिध्दार्थने मीडियाला एक मुलाखत दिली. त्यात नाना पाटेकर यांच्यासोबत काम करताना एकमेकांसोबत बॉंडिंग कसं जुळलं याबद्दल तो भरभरून बोलताना दिसला. नाना पाटेकर यांचं स्क्रिप्ट तोंडपाठ असतं आणि मला ते पाठ करायची सवय नाही त्याबद्दल मी त्यांचा ओरडा खाल्ला आहे. पण त्यांनी थंडीच्या दिवसांत आम्हाला खूप काही बनवून खाऊ घातलं आहे त्याबद्दल मी त्यांना थँक्स म्हणेन.
तर तिथेच सिद्धार्थने त्याच्या रिअल लाईफ बाबांबद्दलही एक वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं. ऑगस्ट महिन्यात सिध्दार्थने त्याची आई सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावू दिलं. त्यावेळी त्याचा हा निर्णय पाहून अनेकांना मोठं कौतुक वाटलं. या वयात आईला कोणी जोडीदार हवाय याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. पण हे सगळं जुळून आलं आणि आईने घेतलेल्या या निर्णयामुळे ती तिच्या आयुष्यात खुश आहे असे तो म्हणतो. या नवीन चित्रपटात बाप मुलाच्या केमिस्ट्रीबद्दल सांगण्यात आलं आहे मात्र तुझ्या बाबांसोबत तुझं बॉंडिंग कसं आहे? असा त्याला प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो की, ” गंमत अशी आहे की, अजून तरी ते बॉंडिंग माझ्याबाजूने स्ट्रॉंग व्हायला वेळ लागेल असं दिसतंय. कारण मुळात ते माझ्या आईचे मिस्टर आहेत पण ते माझे वडील नाहीयेत असं मी म्हणेन. पण तो माणूस फार कमाल आहे म्हणजे तो माणूस खूपच चांगला आहे खूपच चांगला.
म्हणजे आमची मैत्री होईल चांगली. मला असं वाटतंय की वडीलकीचं नातं हे एकदाच होतं. ते वडीलकी असणारा माणूस आहेत खूप आदर असणारा माणूस आहेत. पण मला असं वाटतं की आईसाठी ते जे आहेत ते त्यांचा डायनॅमिक वेगळा आहे आणि माझ्यासाठी तो डायनॅमिक वेगळा आहे.” असे म्हणत सिध्दार्थचे त्याच्या नवीन बाबांसोबत अजून बाप मुलासारखे बॉंडिंग जुळले नाही याचा खुलासा करतो. आईच्या सुखकर नव्या आयुष्यासाठी सिद्धार्थ सारखी बोटावर मोजण्याइतकीच लोक अशी चांगली पाऊले उचलतात लोक फक्त मागून बोलण्याकरता असतात आपलं आयुष्य आपलयाला चांगलं जगण्यात त्यांचा काडीमात्र उपयोग होत नाही हि वस्तुस्थिती आहे.