Breaking News
Home / जरा हटके / हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई पती देखील आहे प्रसिद्ध अभिनेता

हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई पती देखील आहे प्रसिद्ध अभिनेता

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्मिता तांबे हिने गोड़ मुलीला जन्म दिल्याची बातमी तुम्ही वाचली असेल आता आणखीन एक मराठी अभिनेत्री लवकरच आई बनणार आहे. त्या अभिनेत्रीने तिच्या बेबी शॉवरचे फोटो देखील नुकतेच प्रेक्षकांशी शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिचा पती देखील प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे. आम्ही ज्यांच्या बद्दल बोलत आहोत तुम्ही त्यांना ओळखलंच असेल देवयानी मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता संग्राम साळवी लवकरच बाबा बनणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ या मालिकेतून संग्रामने मुख्य भूमिका साकारली होती.

sangram and khushboo
sangram and khushboo

तुमच्यासाठी काय पण …हा मालिकेतला डायलॉग देखील त्यावेळी खूपच प्रचलित झाला होता. ५ मार्च २०१८ रोजी संग्राम साळवीने अभिनेत्री खुशबू तावडे हिच्यासोबत लग्न केले होते. अभिनेत्री खुशबू तावडे आणि संग्रामने आपल्या इंस्टाग्रामवरून ‘बेबी शॉवर’ चे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले असून आपल्या कुटुंबात आणखी एका चिमुकल्या पावलांचे आगमन होणार असल्याचे सांगत ही आनंदाची बातमी दिली आहे. बेबी शॉवर म्हणजेच डोहाळे जेवण बरका … संग्राम साळवी हा मूळचा कोल्हापूरचा. कामानिमित्त तो आपल्या कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाला. देवयानी या मालिकेमुळे संग्रामला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. नुकतीच एक्झिट घेतलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दगडाबाईची चाळ, कुलस्वामिनी, सरस्वती, पन्हाळा अशा चित्रपट आणि मालिकेतूनही त्याला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. तर संग्रामची पत्नी खुशबू तावडे हिने देखील अनेक हिंदी मराठी मालिकांमधून अभिनय साकारला आहे.

sangram and khushboo tawade salvi
sangram and khushboo tawade salvi

मेरे साई, देवयानी, तारक मेहता का उलटा चश्मा, प्यार की एक कहाणी, आम्ही दोघी, तू भेटशील नव्याने, पारिजात, तेरे लिये या मालिकेतून खुशबू महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. काही वर्षांपूर्वी संग्राम साळवी आणि खुशबू यांनी मुंबईत ‘साईड वॉक कॅफे’ या नावाने स्वतःचे कॅफे सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले होते. खुशबू तावडे हिची सख्खी बहीण तीतीक्षा तावडे ही देखील मराठी मालिका अभिनेत्री आहे. तू अशी जवळी राहा, असे हे कन्यादान, सरस्वती या मालिकेतून ती प्रमुख भूमिका साकारताना दिसली. तिनं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं असून आपली बहीण खुशबूमुळं ती अभिनयाच्या क्षेत्रात आल्याचं सांगते. अभिनेत्री खुशबू तावडे साळवी आणि अभिनेता संग्राम साळवी ह्यांना पुढील वाटचालीसाठी आणि घरी येणाऱ्या चिमुकल्यासाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *