Breaking News
Home / जरा हटके / हि मराठी अभिनेत्री नुकतीच बनली आई पती देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता

हि मराठी अभिनेत्री नुकतीच बनली आई पती देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता

मराठी तसेच हिंदी मालिका गाजवणारी अभिनेत्री खुशबु तावडे हिच्याकडे गुडन्यूज आहे. आज बालदिनाचं औचित्य साधून तिने सोशिअल मीडियावर एक खुशखबर दिली आहे. दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून त्याच नाव राघव असल्याचं तिने सांगितलं आहे. खुशबु तावडे असं देखील म्हणाली आहे कि आम्हाला निवडल्याबद्दल धन्यवाद. अभिनेत्री खुशबु तावडे हिने ५ मार्च २०१८ रोजी अभिनेता संग्राम साळवी ह्याच्याशी लग्नगाठ बांधली होती. बालदिनाचं औचित्य साधून दोघांनी देखील हि सुखद बातमी चाहत्यांना दिली आहे.

actor sangram salvi and khushboo tawade
actor sangram salvi and khushboo tawade

देवयानी मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता संग्राम साळवी नुकताच बाबा बनला असल्याचं त्याने सांगितलं आहे. स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ या मालिकेतून संग्रामने मुख्य भूमिका साकारली होती. तुमच्यासाठी काय पण …हा मालिकेतला डायलॉग देखील त्यावेळी खूपच प्रचलित झाला होता. त्यानंतर त्याने काही मालिका आणि चित्रपट देखील केले आहेत. पण तुमच्यासाठी कायपण हा त्याचा डायलॉग आज देखील प्रसिद्ध आहे. संग्राम साळवी हा मूळचा कोल्हापूरचा. कामानिमित्त तो आपल्या कुटुंबासोबत मुंबईत स्थायिक झाला. दगडाबाईची चाळ, कुलस्वामिनी, सरस्वती, पन्हाळा आणि आई माझी काळूबाई अशा चित्रपट आणि मालिकेतूनही त्याने महत्वाच्या आणि उत्तम भूमिका साकारल्या आहेत. संग्रामाची पत्नी अभिनेत्री खुशबु तावडे हीदेखील मराठीतील नव्हे तर हिंदी मालिकांतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने मराठी मालिकांतून सुरवात करत मोठा पल्ला गाठला आहे. प्यार की एक कहाणी, आम्ही दोघी, तू भेटशील नव्याने, पारिजात, तेरे लिये, मेरे साई, देवयानी, तारक मेहता का उलटा चश्मा अश्या मालिकेतून खुशबू तावडे हिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

raghav sangram salvi
raghav sangram salvi

मालिकेदरम्यान ह्या दोघांची ओळख झाली होती. दोघांनी एकत्र कामे देखील केली आहेत. काही वर्षांपूर्वी अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे यांनी मुंबईत ‘साईड वॉक कॅफे’ या नावाने स्वतःचे कॅफे सुरू करून व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले होते. अभिनेत्री खुशबू तावडे हिची बहीण देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तितिक्षा तावडे हि अभिनेत्री खुशबू तावडे हिची सख्खी बहीण आहे. तू अशी जवळी राहा, असे हे कन्यादान, सरस्वती यांसारख्या मालिकांत तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी खुशबू तावडे हिच्या बेबी शॉवर मध्ये देखील संपूर्ण तिला पाहिलं गेलं. आता मी मावशी झाली असल्याने तितिक्षा तावडे देखील खूप खुश असल्याचं ती म्हणते. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने हॉटेल मॅनेजमेंट केलं असून नंतर आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यात ती यशस्वी देखील झाली. अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.