मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी आणि त्यांची पत्नी राणी गुणाजी यांच्या मुलाची एंगेजमेंट पार पडली आहे. मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांना अभिषेक हा एकुलता एक मुलगा आहे. अभिषेक गुणाजी हा देखील मराठी सृष्टीत कार्यरत असून त्याने ‘छल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते या चित्रपटात स्वतः मिलिंद गुणाजी आणि सुमित राघवन यासारख्या कलाकारांनी काम केले होते. याशिवाय कर्जत जामखेड भटकंती सारख्या ट्रॅव्हल सिरीज आणि टिव्हीसी पाईप सारखी जाहिरात त्याने दिग्दर्शित केली आहे.

एक दिग्दर्शक म्हणून अभिषेकला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळाले होते. अभिषेक आणि त्याची गर्लफ्रेंड राधा पाटील यांची नुकतीच एंगेजमेंट झाली आहे. अभिषेक आणि राधा यांची गेल्या अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहे. दिसायला अतिशय देखणी असलेली राधा पाटील मेडिसिन क्षेत्राशी निगडित आहे. अभिषेक गुणाजी आणि राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांची खूप चांगली मैत्री आहे. अमित त्याची पत्नी अभिषेक आणि राधा यांचे एकत्रित असलेले फोटो अभिषेकने अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिषेकने रामणारायन रुईया कॉलेजमधून तसेच थदोमल शहाणी इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. अभिनय क्षेत्रात न येता अभिषेकने आपले पाऊल दिग्दर्शन क्षेत्राकडे वळवली आहेत. चित्रपट, व्यावसायिक जाहिरात यांचे दिग्दर्शन त्याने केले असून गायनाची आणि फोटोग्राफीची देखील त्याला विशेष आवड आहे. आपलं कर्जत जामखेड या सीरीजचे दिग्दर्शन त्याने केले आहे.

मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी हे मराठी सृष्टीतील जाणते कलाकार. हिंदी चित्रपट सृष्टीत मिलिंद गुणाजी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला पाहायला मिळतो. तर राणी गुणाजी यांनी मराठी मालिका सृष्टीतून महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा देखील प्रेमविवाह आहे. कल्पांतर या मराठी मालिकेत हे दोघेही काम करत होते त्यावेळी त्यांची पहिल्यांदा ओळख झाली होती आणि या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. अभिषेक आणि राधा यांची एंगेजमेंट नुकतीच पार पडली असून अभिषेकने गुडघ्यावर बसून अगदी सिनेस्टाईलने राधाला अंगठी घातलेली पाहायला मिळते. या फोटोमध्ये अभिषेक आणि राधा खूपच क्युट दिसत आहेत. अभिषेकने राधा सोबतच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालेला पाहायला मिळतो आहे.