मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण माने यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मालिकेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवत नुकसान भरपाई म्हणून पाच कोटी द्यावेत आणि मालिकेत माझी भूमिका सक्रिय करावी तसेच मालिकेच्या टीमने लेखी माफीनामा द्यावा असेही त्यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे. याबाबत किरण माने असेही म्हणतात की, मला काढून टाकण्याआधी निर्माती टीमने मला काढण्याचं कारण , काही मेल किंवा नोटीस का आली नाही? माझ्यावर झालेल्या आरोपांवर माझी बाजू का जाणून घेतली नाही, मला बेकायदेशीररित्या मालिकेतून काढण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर माझी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी मला मालिकेतून काढलं जातं, त्यानंतर मालिकेतील कलाकारांनी महिलांशी गैरवर्तन केल्याचं कारण समोर दिलं गेलं. माझ्यावर झालेले आरोप धादांत खोटे आहेत , मला ठरवून कटकारस्थान करून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे असे किरण माने यांचे म्हणणे आहे. यासोबतच त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे. सुरुवातीला पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी किरण माने यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर किरण माने यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देत म्हटले की, मी राजकिय पोस्ट केली होती याचा बराचसा संबंध मला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याशी जोडला जातो. मला कोणी काम देणार नाही असेही बोलले जात होते मला धमक्या दिल्या जात होत्या. ही धमकी का? मी आता गप्प बसणार नाही. जातीयवादावर आजवर अनेकांनी भाष्य केले आहे. परंतु जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माणूसकीशी नाळ जोडलेले अनेक लोक आहेत. मला रस्त्यावरून जाताना मायेनं विचारणारी अशी अनेक लोक भेटली आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे म्हणाली. राजकारणी लोकं तर शिव्यांचे धनी असतात पण मला तिथेही जाऊन धक्का बसला की कितीतरी राजकारणी लोक माझ्या मदतीसाठी उतरले, मसनुसपणाचा धागा घेऊन.

परंतु ही लोकं जास्त असली तरी त्यांचा आवाज दाबला जातो त्याउलट मूठभर लोक जातविरोधी मोठा आवाज करतात. मानवतावाद्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातो त्यामुळे कदाचित मंत्र्यांचा आवाज देखील कुठेतरी दाबला जातोय. दहा मध्ये दोन सत्ताधारी असे आहेत जे विषारी वृत्तीचे आहेत ज्यांनी त्यांचा आवाज दाबला असेल…मला फक्त एकच प्रश्न आहे की माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर मला कुठली नोटीस का देण्यात आली नाही?, मी केलेला गुन्हा जर तुम्हाला गंभीर वाटत असेल तर त्याच वेळी मला का नाही जाब विचारला. ह्यात आरोप करणाऱ्यांमध्ये महिला आहेत तर काही पुरुष कलाकार देखील आहेत मग तक्रार सांगताना केवळ महिलांबाबत गैरवर्तन असंच का म्हटलं आहे?…केवळ मीडियाला भरकटवण्यासाठीच हे विधान केले गेले आहे का? मला वाटत माझ्या विरोधात एक ठराविक गट निर्माण झाला आहे कारण बाकीचे कलाकार मला मिस करतायेत असं आवर्जून सांगतायत मग प्रॉडक्शन हाऊसमधील शादाब शेख नावाचा माणूस दुसऱ्याच्या बोलण्यावरून माझ्याविरुद्ध हे सर्व कारस्थान रचतोय असं किरण माने यांनी म्हटलं आहे. मी शेवटपर्यंत लढा देणार आहे आणि न्याय मिळवणार आहे. मी एकमेव असा कलाकार असेल जो अशा दबावाला सामोरे जाताना दिसत आहे.