मराठी मालिका, सिनेमा आणि जाहिरात क्षेत्रातील एक देखणा हिरो असलेल्या भूषण प्रधानच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याची तो त्याच्या चाहत्यांना वाट पहायलाच देत नाही. अगदी जिममधल्या वर्कआऊटपासून ते सणउत्सवात सजलेल्या होमटूरपर्यंत, तो किचनमध्ये बनवत असलेल्या हेल्दी फूडपासून ते त्याच्या खास मैत्रीणींसोबतच्या फोटोपर्यंत प्रत्येक गोष्ट भूषण सोशलमीडियातून चाहत्यांना सांगत असतोच. नुकतीच भूषणने त्याच्या कुटुंबात एक बोल्ड अँड डायनॅमिक मेंबर आणली आहे. तिच्या येण्याचे दणक्यात स्वागत करत भूषणने सहकुटुंब सेलिब्रेशनही केलं आहे.

पण ही मेंबर म्हणजे नवीकोरी कार असल्याचे सांगत स्पेशल फोटोही शेअर केले आहेत. कोरोनाने मरगळलेल्या मनोरंजनसृष्टीला आता पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. दोन वर्षापूर्वी आहे तिथे थांबलेल्या अनेक क्षेत्रात मनोरंजनाला फटका बसला होता. सिनेमे प्रदर्शित होत नव्हते. शूटिंग थांबली होती. मालिकांचे सेट तर दीडवर्षे सुन्न होते. अनेक कलाकारांना कोरोनाच्या विळख्यातून जावं लागलं. लॉकडाउनची तर आठवणसुदधा नको अशी वेळ मनोरंजन इंडस्ट्रीत आली होती. पण आता शूटिंग, नव्या मालिकांचे लाँचिंग, सिनेमा प्रमोशनचे फंडे असं पुन्हा सुसाट धावू लागल्याने कलाकार मंडळी त्यांच्या स्वप्नातील घर, गाडी यांची खरेदी करत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटी कलाकांरानी नव्या खरेदीचा आनंद शेअर केला. अभिनेता आणि मॉडेल भूषण प्रधान यानेही नवी कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते, जे पूर्ण होताच ही आनंदाची बातमी त्याने चाहत्यांना दिली आहे. भूषणच्या इन्स्टा पेजवर नवी कार दिसत असून नव्या कारची किल्ली आईबाबांच्या हातात देताना भूषणने फोटो क्लिक केले आहेत. नव्या कारविषयी त्याने या पोस्टमध्ये भरभरून लिहिले आहे.

तो म्हणतोय की, ही कार चालवायला खूप मजा येणार आहे. शिवाय कोणती कार घ्यायची असा विचार करत असताना हीच कार निवडण्यासाठी थ्ँक्यू ब्रो असं म्हणत आशिश या मित्राचे खास आभार मानले आहेत. भूषण प्रधानच्या आयुष्यात आलेली हि कार त्याची सहजीवन ठरणार असल्याचं तो म्हणतोय. खरंतर गेल्या काही वर्षां आपल्या दांडग्या अभिनयाने भूषणने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक चित्रपट त्याच्या हाती लागले आणि त्याने त्या संधीच सोनं करून दाखवलं. अभिनयच नाही तर आपल्या शरीराकडे देखील तो लक्ष देताना पाहायला मिळतो. फिटनेसच्या बाबतीत तो खूपच सिरीयस असलेला पाहायला मिळतो हेच त्याच्या यशाचं खरं गुपित असल्याचं देखील तो नेहमी सांगतो.