मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेता भूषण कडू याच्या पत्नीचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. भूषणची पत्नी कादंबरी कडू या गेल्या काही दिवसांपासून को’ रो’ नापॉजि टि’व्ह निघाल्या होत्या त्यांना उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी केईएम मध्ये दाखल केले होते. मात्र त्यांची ही झुंज आज अखेर अयशस्वी ठरली. आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

पत्नीच्या निधनाने भूषणच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. भूषण कडू यांना आठ वर्षांचा मुलगाही आहे. भूषण कडूने आजवर चित्रपट आणि मालिकेतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. श्यामची मम्मी, भुताची शाळा, बत्ती गुल हाऊस फुल, मस्त चाललंय आमचं यातून तो प्रेक्षकांसमोर आला. कॉमेडीची gst एक्सप्रेस , कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा माध्यमातून त्याने प्रेक्षकांना हसवले तर कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या सिजनमध्येही त्याने हजेरी लावली होती त्यावेळी बऱ्याच दिवसांनी आपल्या मुलाला पाहताना त्याला अश्रू अनावर झाले होते. बाप आणि मुलातील हे नाते पाहून प्रेक्षकांच्या देखील डोळ्यात पाणी आले. को’ रो’ नाच्या विळख्यात खूप कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तीना गमावले आहे. हे संकट लवकरात लवकर दूर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि अभिनेते भूषण कडू यांच्या पत्नी कादंबरी कडू यांना भावपूर्ण श्रद्धांजली…