मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्न सोहळ्याची धामधूम रंगलेली पाहायला मिळत आहे. काल ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा विवाह संपन्न झाला. त्यासोबतच तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाची लगबग गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली होती मात्र अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे अचानकपणे साखरपुडा करणे हे प्रेक्षकांसाठी तेवढेच आश्चर्यकारक ठरले होते.

या दोघांच्या बातमीसोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. लकी चित्रपट फेम अभिनेता अभय महाजन येत्या काही दिवसातच लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच अभयचे केळवण साजरे करण्यात आले. कालच पर्ण पेठे, अलोक राजवाडे, अक्षय टंकसाळे या खास मित्रांनी अभयचे केळवण केले होते. अभय महाजनला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. बीएमसीसी कॉलेजमधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यातील नाटक कंपनी संस्थेशी तो जोडला गेला. अभिनया सोबतच अभयने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. भडीपाच्या अनेक सिरीजमधून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. संजय जाधव यांच्या लकी चित्रपटातून तो मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकला होता. कहाणी मित्र की, खामोश अदालत जारी है या नाटकातून तो महत्वाची भूमिका साकारताना दिसला. शांतीत क्रांती वेबसिरीज, अवांछित, अश्लील उद्योग मित्र मंडळ अशा चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर झळकला. माझ्याकडं बघतया खुदकन हसतया हे गाजलेलं गाणं अभयवर चित्रित झालं होतं.

गेल्या वर्षीच्या अखेरीस अभय महाजन याने त्यांची खास मैत्रीण दिया नायडू सोबत साखरपुडा केला होता. त्यावेळी साखरपुड्याचे खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. दिया नायडू ही कोरिओग्राफर आहे. हे दोघे आता लवकरच लग्नगाठ बांधताना पाहायला मिळणार आहेत. नुकतेच अभिनेत्री पर्ण पेठे आणि अलोक राजवाडे यांनी अभयचे केळवण साजरे केले होते. तर इकडे देखील दिया नायडू हिचे केळवण झाल्याचे दिसून येतेय. आता लग्नाला काहीच दिवस राहील असल्याचं दिसून येतंय याच महिन्यात ह्या दोघांचं लग्न होणार हे देखील निश्चित आहे. त्यावरून येत्या काही दिवसातच अभय आणि दियाचा लग्नाचा बार उडणार आहे हे निश्चित झाले आहे.