Breaking News
Home / जरा हटके / माजी मुख्यमंत्र्याची नात आहे बॉलिवूड चित्रपटातली ही मराठमोळी अभिनेत्री दिसते खूपच सुंदर

माजी मुख्यमंत्र्याची नात आहे बॉलिवूड चित्रपटातली ही मराठमोळी अभिनेत्री दिसते खूपच सुंदर

आज अनेक हिंदी अभिनेत्री मराठीत येताना पाहायला मिळतात. सुरवातीपासूनच अनेक मराठी अभिनेत्रींनी बॉलिवूड चित्रपटात आपला ठसा उमठवला आहे. येत्या महिन्यात १९ नोव्हेंबर २०२१ रोजी “बंटी और बबली 2” हा बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणारी अभिनेत्री मराठी आहे. अभिनेत्री “शर्वरी वाघ” ही या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हा नवा चेहरा म्हणजे शर्वरी वाघ नक्की आहे तरी कोण ? असा सवाल तुम्हाला पडला असेलच. चला तर जाणून घेऊयात हि नवखी सुंदर अभिनेत्री नक्की आहे तरी कोण….

actress sharvari wagh photos
actress sharvari wagh photos

अभिनेत्री शर्वरी वाघ हि मुंबईत जन्माला आली मुंबईतच ती लहानाची मोठी झाली. शर्वरी वाघ हिचे वडील शैलेश वाघ हे मोठे बिल्डर असून महाराष्ट्रात त्यांचं मोठं नाव आहे. तर शैलेश वाघ यांची पत्नी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी वाघ हिची आई “नम्रता वाघ” ह्या आर्किटेक्ट आहेत. शैलेश वाघ आणि नम्रता वाघ ह्यांना शर्वरी आणि कस्तुरी अश्या दोन मुली आणि अर्णव हा मुलगा असं कुटुंब आहे. शर्वरीची बहीण कस्तुरी वाघ ही देखील आर्किटेक्ट आहे. तर अर्णव वाघ हा शर्वरी आणि कस्तुरीचा धाकटा भाऊ आहे. आता ह्याच्यात विशेष काय असं तुम्ही म्हणाल तर थोडं थांबा. अभिनेत्री शर्वरीची आई नम्रता वाघ या माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांची मुलगी आहे आणि शर्वरी त्यांची नात आहे. अभिनेत्री शर्वरीने वयाच्या १६ वर्षी मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले. २०१३ साली कॉलेजमध्ये असताना क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस काँटेस्टमध्ये तिने सहभाग घेतला होता. या काँटेस्टचे विजेतेपद तिने पटकावले होते. जेफ गोल्डबग स्टुडिओच्या विकेंड थिएटर वर्कशॉप मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. सुरुवातीला काही छोट्या जाहिरातीतून तिला झळकण्याची संधी मिळाली होती.

actress sharvari wagh
actress sharvari wagh

पण तिला यश मात्र मिळत नव्हते. आजोबांचं नाव सांगून तिला लगेच काम देखील मिळालं असत. पण तिने तस न करता स्वतःच्या हिमतीवर छोटी मोठी कमाई करत करत गेली. चित्रपटात चांगली भूमिका मिळवण्यासाठी जवळपास ५ वर्षे ती ऑडिशन देत राहिली. बऱ्याच वर्षानंतर तिला बॉलिवूडच्या काही चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टरची म्हणून नियुक्ती झाली. बाजीराव मस्तानी, प्यार का पंचनामा, सोनू की टिट्टू की स्वीटी अशा ३ बॉलिवूड चित्रपटासाठी तिने असिस्टंट डायरेक्टरचे काम केले आहे आणि हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले होते. २०२० साली शर्वरी द फरगॉटन आर्मी या मिनी सिरीजमध्ये मायाच्या भूमिकेत दिसली. येत्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी शर्वरीचा प्रमुख भूमिका असलेला बंटी और बबली 2 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने शर्वरी आता चांगलीच चर्चेत आलेली पाहायला मिळतेय. यापूर्वी देखील बॉलीवूड मध्ये अनेक कलाकार हे राजकीय घराण्यातून आलेले आहेत. पण अभिनेत्री म्हणून माजी मुख्यमंत्र्याची नात पदार्पणाची हि पहिलीच वेळ असावी. असो अभिनेत्री शर्वरी वाघ हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *