धर्मवीर २ चित्रपटाच्या टिझरमध्ये मोठी चूक…चूक लक्षात येताच मंगेश देसाईंनी माफी मागत दिली हि कबुली
९ ऑगस्ट २०२४ रोजी ‘धर्मवीर २- साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसाद ओक या चित्रपटातून पुन्हा एकदा आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाची निर्मिती उमेश बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. दरम्यान चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला त्यादिवशी त्याला तब्बल ७० लाख व्युव्ह्ज मिळाले होते. तसेच अनेकांनी हा चित्रपट पाहण्याबद्दल उत्सुकता दर्शवलेली पाहायला मिळाली. पण या जाणकार प्रेक्षकांनी टीझर मधली एक मोठी चुकही लक्षात आणून दिली. स्वतः चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनाही ही मोठी चूक असल्याचे आढळून आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये काही चुका आहेत त्या चित्रपटात दुरुस्त केल्या जातील अशी ग्वाही त्यांनी या नेटकऱ्यांना दिली आहे. धर्मवीर २ चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून पाहायला मिळाली होती. चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसमोर येण्याअगोदर मंगेश देसाई यांनी यावर नजर टाकली होती. त्याचवेळी या टिझरमध्ये काही त्रुटी त्यांना जाणवल्या होत्या. पण जेव्हा हा टीझर प्रेक्षकांसमोर आला तेव्हा नेटकऱ्यांनी त्यांना एक मोठी चूक लक्षात आणून दिली. आनंद दिघे जेव्हा रेल्वे लाईनजवळून जात असतात तेव्हा मागून एक ट्रेन धावताना दिसते. पण दिघे साहेबांच्या काळात बॉम्बर्डियर ट्रेन नव्हती ती चित्रपटात कशी काय दाखवली? असा प्रश्न या जाणकार नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली.
बॉम्बर्डियर ट्रेन ही अलीकडच्या काळात सुरू झालेली आहे. दिघे साहेबांचा चित्रपट दाखवता तेव्हा जुन्या काळातली ट्रेन दाखवायला हवी होती असे मत नेटकऱ्यांनी दिले आहे. यावर स्वतः मंगेश देसाई यांनी या चुकीची दखल घेतलेली पाहायला मिळत आहे. ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांनी या नेटकऱ्यांचे कौतुकही केलेले आहे. पण या चुकीत सुधारणा होईल असे आश्वासन त्यांनी चित्रपट प्रेमींना दिले आहे. ही चूक झाल्याबद्दल चित्रपटाच्या टीमनेही माफी मागितली आहे. चित्रपट जेव्हा रिलीज होईल तेव्हा त्यातील या चुका काढल्या जातील असे स्पष्टीकरण मंगेश देसाई यांनी दिलं आहे.