भिडे मास्तरच्या बायकोची मराठी मालिकेत एन्ट्री… स्टार प्रवाहवरील या नवीन मालिकेत मृणालसोबत दिसणार दमदार भूमिकेत
तारक मेहता का उलटा चष्मा ही हिंदी मालिका करोडो प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेतील आत्माराम भिडे हे पात्र देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. ही भूमिका अभिनेते मंदार चांदवडकर यांनी साकारलेली आहे. मंदार चांदवडकर यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी सृष्टी पासुन केली होती. पण तारक मेहता मुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळत गेली. हा चेहरा हिंदी सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे. पण आता त्यांच्याच जोडीला त्यांची पत्नी देखील अभिनय क्षेत्रात दाखल झालेली पाहायला मिळत आहे.
स्नेहल चांदवडकर या मंदार चांदवडकर यांच्या पत्नी आहेत. “१०.२९ की आखरी दस्तक” या हिंदी मालिकेतून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. पण आता स्नेहल चांदवडकर मराठी मालिका सृष्टीत पदार्पण करताना दिसणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थनकर, विजय आंदळकर, विवेक सांगळे यांची मुख्य भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच की प्रेम’ ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत स्नेहल चांदवडकर आत्याच्या म्हणजेच मंजुच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ही भूमिका थोडीशी विरोधी असल्याचे ते सांगतात. स्नेहल चांदवडकर यांचे मराठी सृष्टीतील हे पादर्पण असल्याने या भूमिकेबाबत त्या खूपच उत्साहीत आहेत.
थोडीशी रागीट, गमतीशीर अशी ही भूमिका असल्याने अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा त्यांना साकारता येणार आहेत. लग्नानंतर होईलच की प्रेम मालिकेत अनेक कलाकारांना अभिनयाची संधी मिळत आहे. त्यामुळे या मालिकेला भली मोठी स्टार कास्ट लाभणार आहे . त्यात आता भिडे गुरुजींची रिअल लाईफ पत्नीही मालिकेतून पदार्पण करत असल्याचे दिसून येते. या भूमिकेसाठी स्नेहल चांदवडकर यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!.