मन झालं बाजींद या मालिकेत राया सोबत लग्न करण्यासाठी उत्सुक असलेली ‘अंतरा’ ची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “सानिका काशीकर” हिने. सानिका काशीकर ही मराठी मालिका, नाट्य अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून ओळखली जाते. काही व्यावसायिक जाहिरातीं मध्येही ती झळकली आहे. झी मराठी वाहिनीच्याच नुकतीच एक्झिट घेतलेल्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतही तिने छोटीशी भूमिका साकारली होती. मालिकेतील लंकारी फायनान्समध्ये तीने ‘ईशाची’ भूमिका साकारली होती.

याशिवाय सोनी मराठीवरील ‘आनंदी हे जग सारे’, स्टार प्रवाहवरील ‘वैजू नं 1’ या मालिकेतून सानिकाने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच सानिका उत्कृष्ट गायिका देखील आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे तिने गिरवले असून अनेक सांगीतिक मंचावरून तिने आपल्या गायनाची झलक दाखवून दिली आहे. शिवाय सानिकाने रहेजा कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर येथून इंटेरिअर डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. काही काळ इंटेरिअर डिझायनर म्हणूनही तिने काम केले होते. सानिकाचे कुटुंब देखील संगीत क्षेत्राशी निगडित आहे. तिचे वडील ‘पंडित आनंद काशीकर’ हे उत्कृष्ट बासरीवादक म्हणून कलाक्षेत्रात ओळखले जातात. तर ‘अद्वैत काशीकर’ हा देखील बासरीवादक आहे. अद्वैतने त्याचे वडील पंडित आनंद काशीकर यांच्याकडूनच बासरीवादनाचे धडे गिरवले आहेत. अनेक मंचावरून या दोघांनी एकत्रितपणे आपली कला सादर केलेली पाहायला मिळते. मन झालं बाजींद या मालिकेत सानिका अंतराची विरोधी भूमिकारताना दिसत आहे.

ही भूमिका राया आणि कृष्णाला एकत्र आणेल की त्यांच्यात आणखी वाद निर्माण करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तुर्तास अंतरासोबत लग्न करण्यास उत्सुक असलेला राया आपले मन कसे बदलवणार हे मालिकेतून येत्या काही भागात प्रेक्षकांसमोर येईल. सैराट मधील लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गळगुंडे हा भाजी विक्रेत्याचा काम करताना पाहायला मिळतोय त्याने केलेला अभिनयाचं सर्वच कौतुक करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे सैराट मधील सल्या साकारणारा अभिनेता अरबाज शेख हा देखील ह्या मालिकेत राया सोबत काम करताना पाहायला मिळतोय. ह्या दोघांमुळे मालिका पाहायला उत्साह येतो असं अनेकांचं मत आहे. तुर्तास मालिकेतील अंतराच्या भूमिकेसाठी अभिनेत्री सानिका काशीकर हिला खूप खूप शुभेच्छा…