झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपासून सुरु असलेल्या मन उडू उडू झालंय मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना पाहायला मिळतेय. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय साकारताना पाहायला मिळतात. मालिकेत दीपिका आणि इंद्रा ह्यांची हटके लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. दीपिका हे पात्र अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारले आहे तर इंद्रा च्या भूमिकेत अभिनेता अजिंक्य राऊत पाहायला मिळतोय. ह्या मालिकेत इंद्राची आई साकारणारी अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर हिच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत….

अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर ह्या होणार सून मी ह्या घरची ह्या मालिकेतील बेबी आत्या म्हणून प्रसिद्ध होत्या. ह्या मालिकेमुळेच त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी रंग माझा वेगळा, फुलपाखरू, वन्स मोअर, होम स्वीट होम, होणार सून मी ह्या घरची अशा चित्रपट आणि मालिकेतून त्यांनी अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर अनेक हिंदी मालिकांतही त्या पाहायला मिळाल्या. प्यार तो होना ही था, मेहबुबा अशा हिंदी मालिकेत पूर्णिमा तळवळकर यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या क्यूँ रिश्तों में कट्टी बट्टी ही झी टीव्ही ची हिंदी मालिका त्या अभिनित करत आहेत. पूर्णिमा तळवलकर ह्यांनी रोहित तळवलकर ह्यांच्याशी लग्नगाठ बांधली. पूर्णिमा तळवलकर ही प्रसिद्ध अभिनेत्री, प्रोड्युसर तसेच डायरेक्टर स्मिता तळवळकर ह्यांच्या पुतण्याची बायको आहे. स्मिता तळवळकर ह्यांना अंबर आणी आरती अशी दोन मुले आहेत. मुलगा अंबर तळवळकर हेही अभिनय क्षेत्राशी निगडित आहे. अंबरची पत्नी सुलेखा तळवलकर हि देखील मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयाचा वारसा ह्या सर्वानीच जपलेला पाहायला मिळतो. पूर्णिमा तळवलकर ह्या पूर्वाश्रमीच्या पूर्णिमा भावे. पूर्णिमा भावे हिची बहीण देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे अनेकांना माहित नसेल.

पूर्णिमा भावे तळवलकर हिच्या बहिणीचं नाव आहे पल्लवी भावे वैद्य. स्वराज्यरक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेतून पल्लवी वैद्य ने पुतळामातोश्रींची भूमिका साकारली होती. या मालिकेतून तिला ऐतिहासिक पात्र साकारण्याचे भाग्य लाभले होते असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती. या मालिकेनंतर चला हवा येऊ द्या च्या मंचावरूनही तिने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला. अगंबाई अरेच्चा! या चित्रपटातून पल्लवीने अभिनय क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले होते. कुलवधू ह्या लोकप्रिय मालिकेत पल्लवी झळकली होती. पल्लवी वैद्य ही दिग्दर्शक केदार वैद्य ची पत्नी आहे. झिपऱ्या, माझ्या नवऱ्याची बायको या चित्रपट आणि मालिकेचे दिग्दर्शन त्याने केले आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेचे दिग्दर्शन देखील केदार वैद्य करत आहे. अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि पूर्णिमा तळवळकर बहिणींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…