झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी ‘मन उडू उडू झालं’ ही नवी मालिका दाखल झाली होती. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची लव्हस्टोरी हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. इंद्राची भूमिका अजिंक्य राऊत आणि दिपूची भूमिका हृता दुर्गुळे साकारत आहे. फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेपासूनच अभिनेत्री हृता दुर्गुळेचे फॅन फॉलोअर्स खूप वाढले आहेत. एक्सप्रेशन क्वीन असेही तिच्या बाबत नेहमीच बोलले जाते. मात्र मधल्या काळात हृता बॉडिशेमिंग मुळे चर्चेत येऊ लागली होती. मन उडू उडू झालं या मालिकेत हृता मुख्य नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

परंतु काही दिवसातच तिच्यात आश्चर्यकारक बदल दिसून येत आहेत. कारण सुरुवातीला जाड दिसणारी दिपू मालिकेत काही दिवसातच अगदी फिट दिसू लागली आहे. तिच्यात झालेल्या या बदलामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी हृता गेल्या काही दिवसांपासून मेहनत घेत आहे. मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्यापासूनच हृताने डाएट प्लॅन आणि वर्कआउट करण्यास सुरुवात केली होती. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत तिने घेतलेल्या या मेहनतीमुळे तिच्यात झालेले ट्रान्सफॉर्मेशन सर्वांना दिसून येत आहेत आणि हे बदल नक्कीच आश्चर्यकारक आहेत. मालिकेत जाड दिसणारी दिपू आता एकदम फिट कशी? या प्रश्नाचे उत्तर तिच्या चाहत्यांना आता मिळाले आहे. अर्थात हृताचे चाहते तिच्या अभिनयावर प्रेम करतात त्यामुळे बॉडिशेमिंगमुळे तिला आजवर कोणीही ट्रोल केलं नव्हतं हे विशेष. मात्र हे ट्रोलिंग होण्याआगोदरच तिने तशी काळजी घेतल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुळात बॉडिशेमिंग ही एक मानसिकता आहे.

कलाकाराला त्याच्या अभिनयाने ओळखले जाते ना की त्याच्या शरीरामुळे पण तरीही जाड अभिनेत्री नकोच अशी एक भावना रुजू झाली आहे. याला काही मालिका अपवाद देखील ठरल्या आहेत. झी मराठीचीच येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका असो वा सुंदरा मनामध्ये भरली मालिका या मालिकेच्या नायिका मुळातच त्यांच्या बेढब शरीरामुळे मुख्य भूमिकेत दिसल्या. अर्थात मालिकेच्या कथानकाची मागणी तशीच असल्या कारणाने याही नायिका बनू शकतात ही भावना हळूहळू स्वीकारली जाऊ लागली आहे. तुर्तास हृताने घेतलेल्या मेहनतीचे सध्या सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे हे विशेष. असो ‘मन उडू उडू झालं’ मालिकेला आणि त्यातील दिपूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे याना मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा..