गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या मणक्याला आणि उजव्या पायला देखील मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना हालचाल करणेही शक्य नव्हते. ही बातमी मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पसरली आणि थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पर्यंत जाऊन पोहोचली आणि त्यांनी देखील अभिनेत्रीची चौकशी केलीली पाहायला मिळाली. काल देखील एका भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा जीव थोडक्यात बचावलाय. मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊत ह्याच्यावर हा प्रसंग ओढवला होता.

दिवाळी निमित्त गिफ्ट घेऊन मित्रांसोबत गावी जात असताना गाडी स्किट होऊन ती खांबावर आदरनार हे पाहून गाडी बाजूला घेतली तर ती थेट उताराच्या दिशेने खाली लांब झुडपात जाऊन अडकली. अभिनेता अजिंक्य राऊत ह्याने एका व्हिडिओ द्वारे हि माहिती प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. तो म्हणतो ” सुदैवाने आम्ही बचावलो सुदैवाने तेथे दरी असणारा रोड नव्हता. आमची गाडी थेट ११०० वोल्टच्या खांबावर जाऊन आदळणार होती त्यामुळे मित्राने गाडी बाजूला घेतली तर ती थेट खाली झुडपात जाऊन अडकली देवाच्या कृपेने आम्ही वाचलो व आम्हाला ही दिवाळी बघता आली. यातून मला एक चांगली गोष्ट शिकायला मिळाली ती अशी कि कुठलाच अवार्ड कुठलेच मेडल अश्या प्रसंगामुळे काहीच वाटत नाहीत सारं काही क्षणार्धात नष्ट होण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. व्हिडिओ ची क्लिप टाकताना त्याने पुन्हा एकदा नमूद केलं कि त्यावेळी मी गाडी चालवत नव्हतो. आता पुन्हा गावी चाललोय. गाडी थोडीफार पुढून आणि मागून दोन्ही बाजूने बरीचशी चेबलेली पाहायला मिळत आहे. आणि गाडी त्या झुडपातून काढताना देखील त्यांना ट्रॅक्टर बोलवावा लागला. ट्रॅक्टरला दोरी बांधून त्यांनी त्यांची गाडी झुडपातून बाहेर काढली.

मन उडू उडू झालं हि मालिका सध्या तुफान गाजतेय काही दिवसातच मालिकेने चांगला प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत ह्यांनी ह्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच झी अवॉर्ड सोहळा देखील झाला आणि दिवाळी निमित्त शूटिंग देखील काही दिवसांसाठी थांबलेलं आहे आपल्या प्रमाणेच कलाकारांना देखील आपल्या परिवार सोबत दिवाळी साजरी करता यावी ह्याकरता कलाकार मंडळी दिवसरात्र एक करून दिवाळी आधीच दिवाळीच शूट करून घेतात. इतकच नाही तर दिवाळी विशेष भाग देखील दिवाळीच्या बऱ्याच आधीच पूर्ण करून घेताना पाहायला मिळतात. असो ह्या अपघातात देवाच्या कृपेने सर्वकाही सुखरूप असल्याचं अजिंक्यने सांगितलं आहे. मालिकेतील सर्व कलाकारांना हि दिवाळी चांगली गेली असावी अशी आशा आहे. मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेता अजिंक्य राऊत ह्याला आणि मालिकेतील इतर कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..