मन उडू उडू झालं मालिका फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या अभिनयावर अनेकजण फिदा आहेत. त्यामुळे तिला एक्सप्रेशन क्वीन असेही म्हटले जाते. मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू आणि इंद्राची जुळून येत असलेली प्रेम कहाणी प्रेक्षकाना खूपच भावली आहे मात्र ही प्रेमकहाणी जुळून येत असताना हृता दुर्गुळे हिने खऱ्या आयुष्यात आपल्या बॉयफ्रेंडलाच कबुली दिलेली पाहायला मिळत आहे. हृता दुर्गुळे हिने एक फोटो शेअर केला आहे त्यात तिने दिलेले कॅप्शन साऱ्यांचेच लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे.

हृताच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रिया बापट हीने कमेंट करत ‘जलवा’ असे म्हटले आहे. तर रसिका सुनीलन हीने देखील हृताने दिलेल्या ह्या बातमीला ‘अभिनंदन’ असे म्हटले आहे. सध्या हृताच्या या पोस्टवर कलाकारांपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान हृता कोणाला डेट करत आहे हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. हृता ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्या व्यक्तीचे नाव आहे प्रतीक शाह. प्रतीक शाह उत्कृष्ट डान्सर असून हिंदी मालिका दिग्दर्शक आहे. प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी, इक दिवाना था , मनमोहिनी या गाजलेल्या मालिकांसाठी काम केले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल प्रतीक हा मराठी चित्रपट मालिका अभिनेत्री तसेच हिंदी मालिका अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा शाह यांनी बे दुणे साडे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर, पुछो मेरे दिल से, संभव असंभव अशा मालिकेतून चित्रपटातून अभिनय साकारला आहे. हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी बहुतेकदा नायक नायिकेच्या आईची भूमिका निभावली आहे.

तर मराठी चित्रपटात देखील त्यांनी सहाय्यक तसेच विरोधी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे मराठी सृष्टीत देखील मुग्धा शाह यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला दिसून येतो. हृताने फुलपाखरू या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. २०१९ साली ऋताला झी ने “झी युवा सन्मान २०१९” सन्मानित करण्यात आलं होत. यांनतर झी वाहिनीने “मोस्ट नॅच्युरल परफॉर्मन्स ऑफ द इअर”ने सन्मानित केलं होत. विशेष म्हणजे संस्कृती कलादर्पण २०१९ चा बेस्ट ऍक्टरेस अवॉर्ड “दादा गुड न्युज आहे”ह्या नाटकासाठी ऋताला देण्यात आला होता. मन उडू उडू झालं ह्या मालिकेतील अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचा अभिनय देखील उत्तम आहे शिवाय ती लक्षवेधी अभिनेत्री देखील आहे. मालिकेत तिचं वर्चस्व दिसून येत. डान्स, डायलॉग, रडणं, मुरडन आणि हळवेपणा तिचं सर्वकाही पाहण्यासारखं आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. हृताच्या या गोड बातमीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे तर तितक्याच शुभेच्छा देखील तिला मिळताना दिसत आहेत.