Breaking News
Home / जरा हटके / मन उडू उडू झालं मालिकेत आता बालपणीचा अजिंक्य पाहायला मिळणार नव्या ट्रॅकमुळे अजिंक्यच्या भूमिकेला कात्री

मन उडू उडू झालं मालिकेत आता बालपणीचा अजिंक्य पाहायला मिळणार नव्या ट्रॅकमुळे अजिंक्यच्या भूमिकेला कात्री

मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रा आणि दीपू यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडतेय. या मालिकेत सध्या या दोघांच्या प्रेमाला घरातून कडाडून विरोध सुरू आहे. लवकरच या मालिकेतून इंद्राची भूमिका साकारणारा अजिंक्य राऊत गायब होणार असून त्याची जागा दुसराच अभिनेता घेणार आहे. काय आहे कारण आणि अजिंक्य का दिसणार नाही ? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. नवा ट्रॅक सध्याच्या लोकप्रिय असलेल्या मन उडू उडू झालं या मालिकेतही पहायला मिळणार आहे. या मालिकेचा नायक आणि इंद्रा या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊतच या मालिकेत दिसणार नाही तर त्याच्याऐवजी दुसऱ्याच कलाकाराला प्रेक्षकांना पहावं लागणार आहे.

actress hruta durgule
actress hruta durgule

सध्या या मालिकेत इंद्रा आणि दीपू यांचं प्रेम असल्याचं घरात कळतं. पण इंद्रा हा बँकेत वसुलीचं काम करत असल्याने दीपूचे वडील आणि इंद्राचे शिक्षक त्यांच्या प्रेमाला कडाडून विरोध करत असल्याचा ट्रॅक सुरू आहे. इंद्राच्या आईलाही खरंतर दीपू आणि इंद्राचं नातं मान्य असतं पण इंद्रानेही वसुलीचं काम करत असल्याचं न सांगितल्याच्या रागातून अबोला धरला आहे. मालिकेच्या या ट्रॅकमध्ये इंद्राने जे केलं ते परिस्थितीमुळे आणि वडिलांच्या निधनानंतर घर चालवण्यासाठी केलं असं म्हणत इंद्राचा मित्र सत्तू त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करूनही इंद्रावर घर सोडण्याची वेळ आली आहे. सध्या इंद्रा सत्तूच्या घरी राहत असून दीपूनेही बाबांच्या विरोधात जाऊन इंद्राला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मालिका सध्या या वळणावर आली असताना अचानक इंद्राची भूमिका करणाऱ्या अजिंक्य राऊतच्या जागी दुसऱाच अभिनेता दाखवण्याची तयारी सुरू झाली आहे. याला कारणही खास आहे. इंद्राने त्याच्या घरासाठी अगदी शालेय वयापासून पडेल ते काम केलं याचा साक्षीदार त्याचा मित्र सत्तू आहे. सत्तू आता दीपिका आणि देशपांडे सर यांना इंद्राच्या बालपणातील संघर्षाविषयी सांगताना पुढच्या काही भागात दिसणार आहे.

indra actor ajinkya raut
indra actor ajinkya raut

त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना इंद्राच्या बालपणात घेऊन जाणार आहे. म्हणूनच पुढच्या काही एपिसोडमध्ये इंद्राचं बालपण, वडीलांच्या निधनानंतर त्याने घरासाठी केलेले कष्ट याची गोष्ट उलगडणार आहे. त्यामुळेच मोठया इंद्राच्या जागी लहान इंद्रा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. छोट्या इंद्राच्या भूमिकेसाठी नव्या कलाकाराची निवड झाली असून अजून त्या बालकलाकाराचं नाव जाहीर केलेलं नाही. पण हा नवा ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत ही जोडी मन उडू उडू या मालिकेमुळे इतकी लोकप्रिय झाली आहे की या जोडीच्या सोशल मीडियावरील फोटोंना लाखो लाइक्स मिळत असतात. हृता आणि अजिंक्य सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असल्याने त्यांना प्रतिसाद मिळत असतो. मन उडू उडू झालं या मालिकेत अजिंक्य राऊत हा इंद्रजित साळगावकर तर हृता ही दीपिका देशपांडे ही भूमिका साकारत आहे. इंद्रा आणि दीपू या नावाने ही जोडी सध्या मालिका विश्वात खूपच गाजतेय.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *