झी मराठी वाहिनीवर मन झालं बाजींद ही मालिका प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेत राया, कृष्णा, फुई आज्जी, गुली, भाऊसाहेब विधाते, आशा मामी , मुंजा, सोपान मामा यासर्वच पात्रांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मालिकेत रायाची आई साकारली आहे अभीनेत्री “वैशाली राजेघाटगे” यांनी . वैशाली राजेघाटगे नेमक्या कोण आहेत ते जाणून तुम्ही त्यांचे नक्कीच कौतुक कराल. मालिकेत आई साहेबांची भूमिका वैशाली राजेघाटगे यांनी साकारली आहे. वैशाली राजेघाटगे या सातारच्या…

त्यांनी भरतनाट्यमचे धडे गिरवले असून कोरिओग्राफर म्हणून कलाक्षेत्रात त्यांनी काम केले आहे. भरतनाट्यममध्ये एम ए आणि अलंकार ही पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. गेल्या २५ वर्षांपासून रंगभूमीवर सक्रिय असून नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांचा हातखंडा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या दिग्दर्शिका असा मान त्यांनी पटकावला आहे. अभिनय, नृत्य दिग्दर्शन, निर्माती अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी मोठी भरारी घेतलेली पाहायला मिळते. राज्यस्तरीय नृत्य दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय, इनर्व्हील क्लब नृत्य स्पर्धा अशा स्पर्धांमधून त्यांना बक्षिसे देखील मिळाली आहे. राज्य, देश यांसह त्यांनी थायलंड, सिंगापूर, युरोप येथे नृत्य सादर करून गोल्ड तसेच सिल्व्हर मेडल पटकावली आहेत. सातारा येथे त्यांची नृत्य अकॅडमी आहे त्यात अनेक मुलामुलींना नृत्याचे धडे दिले जातात . वैशाली राजेघाटगे यांच्या कलाधाम ग्रुपने थायलंड बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेत फायनलमध्ये गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल आणि वैशाली राजेघाटगे यांनी बेस्ट कोरिओग्राफर अवॉर्ड मिळवून सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी आणि मन झालं बाजींद या मालिकेतील भूमिकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…