जरा हटके

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्याच्या मुलाची वाजत गाजत मोठ्या थाटात केली मुंज

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परांजपे वकिलाची भूमीका चैतन्य चंद्रात्रे याने साकारली होती. यश सोबत लग्न जुळण्याआगोदर नेहाची वहिनी मीनाक्षीने नेहाच्या लग्नासाठी परांजपे वकीलाचे स्थळ सुचवले होते. मालिकेत परांजपेची भूमिका काहीशी विरोधी होती. नेहा सोबत लग्न करून तो परीला सोडून देणार होता आणि तिचे घर आपल्या नावावर करून घेणार होता त्याचा हा डाव यशने उधळून लावला. त्यानंतर ह्या पात्राची मालिकेतून एक्झिट झाली होती. मात्र आजही ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे.

chaitanya chandratre son munj
chaitanya chandratre son munj

चैतन्य चंद्रात्रे या अभिनेत्याला बहुतेकांनी ओळखले असेल. ‘आभास हा’ या गाजलेल्या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरसोबत त्याने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. नुकतेच चैतन्यच्या मुलाच्या मुंजीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. पुलकित ची मुंज असे कॅप्शन देऊन त्याने मुलाच्या मुंजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुंज किंवा उपनयन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी तेरावा संस्कार मानला जातो. चैतन्यने त्याच्या मुलाची मुंज वाजत गाजत मोठ्या थाटात साजरी केलेली पाहायला मिळते आहे. चैतन्य नेहमीच आपल्या मुलांसोबत मजामस्ती करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेव्यतिरिक्त ‘रुंजी’, ‘एका पेक्षा एक’, ‘व्याप कुणाचा ताप कुणाला’, ‘कुलवधू’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘एक तारा’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’, ‘फ्रेंड्स’, ‘गुलमोहर’ अशा चित्रपट आणि मालिकेतून त्याला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

actor chaitanya chandratre family
actor chaitanya chandratre family

सुरुवातीला केएफसी सारख्या काही मोजक्या व्यावसायिक जाहिरातीतूनही त्याने मॉडेलिंग केले आहे. अभिनयाचा त्याचा हा प्रवास सुरु असतानाच त्याने व्यवसाय क्षेत्राकडे वळण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय त्याने घेतला. कौस्तुभ आठवले, कुमार गौरव आणि अभिषेक कुमार या मित्रांच्या मदतीने त्याने ‘ए बी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना केली. या स्टुडिओमधून ‘सुलतान’, ‘बाहुबली 2’, ‘वेलकम टू कराची’, ‘धूम 3’ या भारतीय चित्रपट तसेच ‘कुंगफू योगा’, ‘रेसिडेंट एव्हील’, ‘फास्ट अँड फ्युरिअस’ अशा परदेशी चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्टसचं काम त्यांनी केलं. गेल्या काही वर्षात अनेकांना आपले सोहळे थाटात साजरे करता आले नाही पण आता सगळे निर्बंध उठले असल्याने आता पुन्हा लोक पूर्वी प्रमाणेच सॅन सोहळे साजरे करताना पाहायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button