माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून रसिक प्रेक्षकांच्या पसंतीची बनली आहे. या मालिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि बालकलाकार मायरा हे तिघेही मालिका तसेच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात या मालिकेतील एका दिग्गज अभिनेत्रीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती अभिनेत्री नेमकी कोण आहे हेच या बातमीमधून जाणून घेणार आहोत. माझी तुझी रेशीमगाठमध्ये सर्वच कलाकार आपली भूमिका अगदी चोखपणे बजावत आहेत. अशात यामध्ये सिमी हे पात्र देखील खूप गाजलं आहे.

आतापर्यंत अभिनेत्री शीतल क्षीरसागर हे पात्र साकारताना दिसत होती. मात्र आता तिने या मालिकेला कायचा राम राम ठोकल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या मालिकेचा चाहता वर्ग नाराज आहे. तसेच शीतलच्या चाहत्यांना तिने ही मालिका का सोडली? याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शीतलला एका मोठ्या नाटकाची ऑफर मिळाल्याने ती ही मालिका सोडत असल्याचं समोर येत आहे. पण या करता तिने हि प्रसिद्ध मालिका सोडली कि नाही हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. अभिनेत्रीने या आधी देखील अनेक मोठ मोठ्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. या आधी ती आई कुठे काय करते या मालिकेत विरोधी पात्र साकारत होती. मात्र तिच्या कामाला योग्य दाद मिळत नसल्याचं कारण सांगत तिने ही मालिका सोडली. यासह तिने का रे दुरावा, एक होती राजकन्या या मालिकेत देखील अभिनय केला आहे. शीतलच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी आणखीन सांगायचे झाल्यास गेल्या २० वर्षांपासून ती अभिनय क्षेत्रात काम करत आहे.

१९९९ साली आरंभ या चित्रपटातून तिने सिसृषातीत पदार्पण केले. या नंतर एक होती वादी या चित्रपटात तिला प्रमुख भूमिका मिळाली. हा चित्रपट तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कारण यातील वादी हे प्रमुख पात्र तिला सकरायचे होते आणि वादी ही चित्रपटात मुकी होती. त्यामुळे चेहऱ्यावरील हावभाव खूप महत्त्वाचे होते. या चित्रपटासाठी शीतलने खूप मेहनत घेतली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून देखील मोठी दाद मिळाली. यात विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनासह एक होती वादीला एकूण ५३ पुरस्कार मिळाले होते. अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिला आजवर प्रमुख भूमिका साकारायला मिळाल्या नसल्या तरी तिने केलेलं काम मुख्य भूमिकेच्या तोडीस असल्याचं नेहमीच दिसून येत. निगेटिव्ह भूमिका इतकी ताकतीचा निभावतात कि पाहणाऱ्याच्या मनात तिच्याबद्दल नेहमीच तिरस्कार पाहायला मिळतो.