Breaking News
Home / जरा हटके / मैने प्यार किया चित्रपटातील भाग्यश्रीबद्दल बोलताना सलमान खानची जीभ घसरली

मैने प्यार किया चित्रपटातील भाग्यश्रीबद्दल बोलताना सलमान खानची जीभ घसरली

१९८९ सालचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट सलमान खान आणि भाग्यश्री यांचा प्रमुख भूमिका असलेला पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला होता. चित्रपटातील प्रेम आणि सुमनची लव्हस्टोरी आणि त्यातील गाणी तुफान लोकप्रिय ठरली होती. एका रात्रीत सुपरस्टार बनण्याचा मान या चित्रपटातून दोघांनाही मिळाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी सलमान खानला या चित्रपटाबद्दल विचारले असता त्याने या चित्रपटाची नायिका भाग्यश्रीबद्दल वक्तव्य केले आहे ते प्रेक्षकांना खरोरच न पटण्यासारखे आहे. त्याच्या या वक्त्यव्यावर अनेकांनी विरोध देखील दर्शवलेला पाहायला मिळतो आहे. सलमान खान भाग्यश्रीबद्दल नेमके काय बोलला ते जाणून घेऊयात…

salmankhan and bhagayashree
salmankhan and bhagayashree

मैने प्यार किया या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हिंदी सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. चित्रपट संपल्यावर अभिनेत्री झीनत अमानने चित्रपट आवडला नसल्याची प्रतिक्रिया सलमान खानला दिली होती. हा चित्रपट किती बालिश आहे एका सीनमध्ये भाग्यश्रीच्या गुडघ्या खाली लागलं असताना तू तीच्या तळपायाला का चोळतोएस? असा प्रश्न केला तेव्हा सलमान खान हसत हसत म्हणाला की, भाग्यश्रीनेच हा सिन तसा घेण्यासाठी सांगितले होते. तिचा गुडघा त्यात दाखवला जाऊ नये अशी तिची ईच्छा होती, मी यावर काहीच करू शकत नव्हतो असे सलमान म्हणतो. भाग्यश्रीने चित्रपटातले बरेचसे सिन तिला हवे तसे घ्यायला लावले असे सलमान म्हणतो. पुढे आला किसिंग सिन हा सिन कसा शूट करायचा म्हणून सलमान खान अनकम्फरटेबल असल्याचे दिग्दर्शकाला सांगतो त्यावर दिग्दर्शक देखील म्हणतो की तू फक्त अनकम्फर्टेबल आहेस तिकडे भाग्यश्रीने हा किसिंग सिनच रिजेक्ट केला आहे. भाग्यश्रीचे लग्न अगोदरच झाले असल्याने किसिंग सिन देण्यास भाग्यश्रीने विरोध केला होता. पण चित्रपटाच्या मागणीनुसार हा सिन दोघांच्या मध्ये काच ठेऊन शूट करण्यात आला असल्याचे सलमान या मुलाखतीत हसुन हसून सांगतो.

maine pyaar kiya film
maine pyaar kiya film

चित्रपटात भाग्यश्रीने शॉर्ट ड्रेस घातल्याचे दाखवले होते. ह्या सिनला भाग्यश्रीचा नवरा हिमालय दासानी यांनी विरोध दर्शवला होता. माझी पत्नी शॉर्ट ड्रेस घालणार नाही असे त्याचे स्पष्ट मत होते. इकडे सलमानला हिमालयच्या या निर्णयाची चीड आली होती. ह्या उडालेल्या गोधळावर सलमान म्हणतो की ‘हिमालय माऊंटन’नी ती माझी पत्नी असल्याचे सांगत हा सिन दुसऱ्या कोणी व्यक्तीने पाहू नये म्हणून रिफ्लेक्टरला लावलेल्या भल्या मोठ्या कपड्याच्या आत शूट केला जावा असे सांगितले होते. चित्रपटाच्या टीमने देखील लगेचच तो भला मोठा रिफ्लेक्टरचा कपडा दोन भागात फाडला आणि त्याच्या आत हा सिन शूट केला गेला. हे सर्व सांगताना भाग्यश्रीच्या नवऱ्याबद्दल तो हिमालय माउंटन असे वक्तव्य करताना दिसतो आणि ह्या सर्व सिच्युएशनमधून जाताना मला किती त्रास झाला हे भाग्यश्रीची फिरकी घेत तो सांगतो. यावरून प्रेक्षकांनी आता सलमानला धारेवर धरले आहे. त्याच्या विरोधात सोशल मीडियावर प्रेक्षक कमेंट करताना दिसत आहेत…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *