माझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक होती.. माझ्या १५ वर्षाची मेहनत वाया गेलीच शिवाय प्रचंड अपमान आणि मनस्ताप सहन करावा लागला
लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ यांच्या जोडीने एकामागून एक हिट चित्रपट दिले. १९८७ साली आलेला “दे दणादण” हा चित्रपट खूप गाजला होता. हाच चित्रपट त्यांनी हिंदी भाषेत देखील केला चित्रपटाचं नाव होत ‘लो मै आ गया’. चित्रपट खूप चालेल अशी महेश कोठारेंना खात्री होती. गोविंदाचा भाचा विनय आनंद आणि जोडीला लक्ष्मीकांत बेर्डे, मोहन जोशी, रीमा लागू, मकरंद देशपांडे, दीपक शिर्के, प्रेम चोपडा अशी त्यावेळची दिग्गज स्टारकास्ट चित्रपटाला लाभली होती.
अनेक मराठी चित्रपट सुपरहिट होत असताना हिंदीत देखील आपलं नाव होईल आणि पैसा देखील कमावता येईल ह्या आशेने महेश कोठारेंनी १५ वर्षाची मेहनत करून कमावलेले सर्व पैसे ह्या चित्रपटासाठी लावले. ८ जानेवारी १९९९ रोजी ‘लो मै आ गया’ हा चित्रपट रिलीज झाला. पण बॉक्सऑफिसवर हा चित्रपट सफशेल फेल गेला. चित्रपटासाठी लावलेले पैसे देखील तिकिटातून वसूल झाले नाहीत. महेश कोठारे यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. या चित्रपटानंतर महेश कोठारें याना प्रचंड अपमान आणि मनस्ताप सहन करावा लागला होता.
मराठी चित्रपटांत यशाच्या शिखरावर असताना हे अपयश पचवणं खूपच अवघड झालं होत. कर्ज इतकं वाढलं होत कि महेश कोठारेंना त्यांचं राहतं घर देखील विकावं लागलं. ह्यातून बाहेर पडायला महेश कोठारेंना १० वर्षांहून अधिक काळ लागला. तेंव्हा आदिनाथ देखील लहान होता १० वी नंतर त्याला हवं ते शिक्षण देण्यासाठी देखील पैसे नव्हते असं ते म्हणतात.