Breaking News
Home / जरा हटके / “रिक्षावाल्याचे कारस्थान पाहून मी…” महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकाराने सांगितला वाईट अनुभव

“रिक्षावाल्याचे कारस्थान पाहून मी…” महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकाराने सांगितला वाईट अनुभव

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप या कलाकाराला नुकताच एक वाईट अनुभव आला आहे. रिक्षावाल्याची अरेरावी आणि मुजोरी पाहून हा प्रकार वेगळाच काही असल्याचे लक्षात येताच पृथ्वीकने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. हा प्रकार नेमका काय आहे हे जाणून घेऊयात… दिनांक २१ जानेवारी २०२२, रात्री ९ च्या दरम्यान मी ग्रीन वॅली स्टुडिओज (काशिमीरा, मीरारोड) मधून शूटिंग आटपून घरी जाण्यास निघालो, नेमकी स्वतःची गाडी आज आणली नाही म्हणून ओला उबेर बुक करण्याचा प्रयत्न करत होतो पण नेटवर्क वीक असल्यामुळे ते काही घडेना.

maharashtrachi hasyajatra actors
maharashtrachi hasyajatra actors

शेवटी वैतागून चालत स्टुडिओ गेट मधून बाहेर पडलो आणि एका रिक्षा वाल्याला हात दाखवून विचारलं ‘ठाणे?’ त्यानेही तडक गाडी वळवली, मी बसलो, मीटर पडलं आणि आम्ही निघालो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून त्याने गाडी कांदिवली दिशेला वळवली मी त्याला म्हणालो ‘थांब, आपल्याला ठाण्याला जायचंय गाडी घोडबंदर ने घे’ त्यावर त्याने ‘इधर से भी जाता है गाडी ठाणे को’ असं म्हणत त्याच्या मनाविरुद्ध रिक्षा fountain हॉटेल च्या दिशेने वळवली. पण तो गाडी घोडबंदर च्या दिशेने नेण्याऐवजी वसई च्या दिशेने नेऊ लागला. मी पुन्हा त्याला म्हणालो ‘घोडबंदर मागे आहे, fountain च्या रस्त्याने जायचंय आपल्याला’ त्यावर तो चिडला आणि म्हणाला ‘मेरे को मत सिखा किधर क्या है, चुपचाप बैठ’ मी गाडी थांबव म्हणत असताना देखील तो वसई च्या दिशेने गाडी नेऊ लागला.मी तडक ‘१००’ नंबर वर फोन केला माझ्यासोबत घडणारा प्रकार पोलिसांना सांगितला, रिक्षाचा नंबर पोलिसांना सांगतोय हे कळताच त्या रिक्षावाल्याने रिक्षा पुन्हा fountain च्या दिशेने वळवली आणि म्हणाला ‘पोलीस को क्यू फोन कर रहे, गल्तीसे ये रस्ते पे गाडी डाला मैने’… आणि fountain हॉटेल जवळ त्याने गाडी थांबवली.

pruthvik pratap and riskshawala
pruthvik pratap and riskshawala

मी तडक गाडीतून उतरलो त्याचा फोटो काढला आणि त्याला म्हणालो कि ‘तेरा आयकार्ड, परमिट जो कूछ होगा दिखा’ त्यावर हुज्जत घालत तो म्हणाला ‘तू RTO वाला है क्या? तेरेको क्यू दिखाऊ, पोलीस को क्यू फोन लगाया? मेरी भी पुलिस में पहचान है, २० साल से है इस धंदे में, बोहोत देखे है पुलिस वाले’ मी त्याला शांतपणे म्हणालो ‘थांब आता जे पोलीस येतील त्यांच्याशी पण ओळख करून घे म्हणजे नंतर काठी ची साईज किती हवी ते तू त्यांना सांगू शकशील’ साधारण १० मिनिटे हुज्जत घातल्यानंतर त्याने तिथे येणारे काही पोलीस पाहिले आणि त्याने तिथून धूम ठोकली. मी पोलिसांना फोन केल्यानंतर अगदीच १५ ते २० मिनिटांत माझ्या मदतीला ४ पोलिसवाले तिथे हजर होते. या सगळ्याच श्रेय ‘सिनिअर पीआय वसंत लबडे यांना जातं, त्यांनी तातडीने मदत पाठवली म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो. हि पोस्ट लिहिण्याचं कारण इतकचं कि माझे कित्येक मित्र मैत्रीण मीरारोड मध्येच शूटिंग करतात, बऱ्याचदा त्यांचं शूटिंग संपायला मध्यरात्र उलटते त्यामुळे त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि महाराष्ट्र पोलिसांमुळे तितकाच निर्धास्त हि राहावं.
पोस्ट सोबत रिक्षा वाल्याचा नाव, गाडीचा नंबर आणि त्याचा फोटो जोडतोय. जेणेकरून कुठल्या रिक्षात आपल्याला बसायचं नाहीये हे सुद्धा कळेल.
नाव – राजेशकुमार हुबलाल यादव रिक्षा नंबर – MH02EQ0172

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *