Breaking News
Home / जरा हटके / सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत झळकणार मधुराज रेसिपीजच्या मधुरा बाचल

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत झळकणार मधुराज रेसिपीजच्या मधुरा बाचल

छोट्या पडदयावरील मालिकांमध्ये सतत काही ना काही नाट्यमय वळणं यावीच लागतात. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवणून ठेवण्यासाठी मालिकेतील कलाकारांना कधी गायब करावं लागतं किंवा नव्या पात्राची एन्ट्री करून उत्सुकता वाढवावी लागते. अशीच एक नवी एन्ट्री सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत होणार आहे. पण हे नवीन येणारं पात्र म्हणजे अभिनयक्षेत्रातील नव्हे तर खाद्यपदार्थ क्षेत्रातील प्रसिध्द चेहरा आहे. हो, मधुरा रेसिपी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गृहिणींच्या लाडक्या मधुरा बाचल आता लवकरच गौरी आणि शालिनी या दोघींमध्ये सर्वोत्तम सुगरण कोण याचा फैसला करण्यासाठी येणार आहेत.

madhura bachal in sukh mhanje nakki kay ast
madhura bachal in sukh mhanje nakki kay ast

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही एपिसोडपासून अनेक धक्कादायक वळणं येतं आहेत. जी शिर्केपाटील पाटील घरात मोलकरीण म्हणून राहत होती ती गौरी जयदीप शिर्केपाटीलशी लग्न झाल्याने सून बनली. पण आता तर गौरीच माई आणि दादा यांची मुलगी असल्याचं सत्य समोर आलं. त्यामुळे नंदिनी गृहोद्योगची मालकीण बनून गौरीने कारभार हातात घेतला आहे. पण यामध्ये जयदीप हा दादांच्या मित्राचा मुलगा असल्याचे कळल्याने त्याने कारभाराच्या किल्ल्या गौरीकडे सोपवल्या. मालिका सध्या अशा रंजक वळणावर असताना गौरीला जयदीपसाठी एक गिफ्ट द्यायची आहे. त्यासाठीच गौऱी रेसिपी शोमध्ये सहभागी होताना दिसणार आहे. या स्पर्धेत तिच्यासमोर जाऊबाई शालिनीचं आव्हान आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या याच ट्रॅकमध्ये मधुरा बाचल यांची एन्ट्री होणार आहे. मधुरा यांची सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत एन्ट्री होणार हे कळल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आनंद झालाच, पण त्यांना अभिनय करताना पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. खरं तर मधुरा नेमकी कोणती भूमिका करणार अशी चर्चा सुरू आहे.

madhura bachal madhuras recipe
madhura bachal madhuras recipe

पण मालिकेत रेसिपी स्पर्धेचा ट्रॅक असल्याने मधुरा या परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे मधुरांना खऱ्या आयुष्यातील पात्र या मालिकेत रंगवावे लागणार आहे. मधुरा यांच्या साध्या आणि सोप्या रेसिपींच्या अनेक गृहिणी फॅन आहेत. मधुरा यूट्यूब चॅनेल चालवण्यासोबतच स्वत: बनवलेल्या मसाल्यांचीही विक्री करतात. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून त्या रेसिपी बनवण्याच्या आवडीमुळे या क्षेत्रात आल्या. मधुरा यांचे ६ मिलीयन्स इतके फॉलोअर्स आहेत. यापूर्वी मधुरा बाचल या मस्त मजेदार किचन कल्लाकार या शोमध्ये राजशेफच्या भूमिकेत दिसल्या होत्या. पण काही दिवसांचीच त्यांनी तेथे काम केलं होत. जयंती कठाळे ह्या त्या शो मध्ये राजशेफ म्हणून काम पाहत होत्या पण काही दिवस बाहेरगावी जावे लागल्यामुळे मधुरा बाचल यांनी ते काम पाहिलं होत. असो आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील पदार्पणासाठी मधुरा बाचल याना खूप खूप शुभेच्छा …

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.