मराठी अभिनेत्रींचे अनेक डान्स तुम्ही ह्यापूर्वी देखील पहिले असतील पण मेकअप व्हॅन मध्ये एका पाठोपाठ येऊन अभिनेत्रींनी केलेला हा डान्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलाय. लव्ह लग्न लोचा ह्या मालिकेतील ह्या अभिनेत्रीने व्हॅनमध्ये हा मराठमोळ्या सुंदर साड्या घालून अभिनेत्रींनी हा डान्स केलाय. मालिकेत ह्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेतच पण त्यांनी केलेला हा आगळा वेगळा डान्स चा प्रयत्न यशस्वी झालेला दिसून येतोय. चला तर पाहुयात ह्या कोण कोण अभिनेत्री आहेत ज्यांनी हा भन्नाट डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकलीत.

झी युवा वाहिनीने युवापिढीसाठी अनेक उत्तमोत्तम मालिका सादर केल्या आहेत त्यातली लव्ह लग्न लोचा हि मालिका खूपच गाजली होती. मालिकेतील सर्वच कलाकार चांगला अभिनय सादर करत होते. युवा पिढीसाठी बनवण्यात आलेल्या ह्या मालिकेला कॉलेज युवक आणि युवतींनी चांगलंच डोक्यावर घेतलं होत. विशेष म्हणजे घरगुती महिला देखील ह्या मालिकेला आपली विशेष पसंती दाखवत होत्या. पण आता आपण चर्चा करतोय ती ह्या मालिकेतील अभिनेत्रींनी केलेल्या भन्नाट डान्स बद्दल.. ह्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अभिनेता अनुक्रमे आहेत रुचिता जाधव, सुमेहा सुळे , अक्षया गुरव आणि स्नेहा रायकर. ह्या सर्व अभिनेत्रींनी खूपच सुंदर डान्स केला आहे. कमीने चित्रपटातील “रात के ढाई बजे, कोई शहनाई बजे, दिल का बाज़ार लगा, ढेला तक पाई बजे… ” ह्या गाण्यावर ताल धरत त्यांनी हा डान्स व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. ह्यात अभिनेत्री रुचिता जाधव आणि अक्ष गुरव ह्या अभिनेत्री खूपच सुंदर दिसतायेत. मालिका संपून कित्तेक दिसावं झाली आहेत पण हा डान्स व्हिडिओ आजही तितकाच व्हायरल होताना दिसतोय.