Breaking News
Home / जरा हटके / लोकमान्य मालिकेतून स्पृहा जिंकतंय प्रेक्षकांची मने तर… बहीण देखील आहे प्रसिद्ध व्यक्ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय नाव

लोकमान्य मालिकेतून स्पृहा जिंकतंय प्रेक्षकांची मने तर… बहीण देखील आहे प्रसिद्ध व्यक्ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलंय नाव

लोकमान्य या झी मराठीवरील मालिकेत स्पृहा जोशी आणि क्षितिश दाते यांची प्रमुख भूमिका म्हणून एन्ट्री झालेली आहे. मालिका सुरू झाल्यापासून हे दोघे कधी एकदा मालिकेत सक्रिय होतील असे त्यांच्या चाहत्यांना झाले होते. मात्र मालिकेने लीप घेताच या दोघांचा अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. उंच माझा झोका या मालिकेतील स्पृहाने साकारलेली भूमिका खूप गाजली होती. टिळकांच्या पत्नीच्या भूमिकेत स्पृहा अगदी चपखल बसली आहे. सृहा जोशी ही बालमोहनची माजी विद्यार्थिनी या शाळेने अनेक कलाकारांना घडवलं आहे. बालकलाकार ते मराठी सृष्टीत प्रमुख भूमिका अशा माध्यमातून ही कलाकार मंडळी पुढे आलेली आहेत. स्पृहाने अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालन अशा विविधांगी भूमिका बजावलेल्या आहेत.

spruha joshi sister kshipra
spruha joshi sister kshipra

स्पृहाची बहीण देखील एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. क्षिप्रा जोशी हे स्पृहाच्या बहिणीचे नाव. क्षिप्रा देखील बालमोहनची माजी विद्यार्थिनी तिने देखील रुईया कॉलेजमधुन पदवीचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच खेळाची विशेष आवड असलेल्या क्षिप्राने पुढे मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट मधून डिप्लोमा केलेला आहे. २०१० साली वर्ल्ड जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप मध्ये जिम्नॅस्टिक प्लेअर म्हणून क्षिप्राने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
प्रीमिअर रिदमीक जिम्नॅस्टिक अकॅडमी येथे ती सिनिअर कोच म्हणून कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघ अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर जजची भूमिका तिने निभावली होती. २१ मार्च २०११ रोजी एका मिनिटामध्ये ‘१८० डिग्री बॅलन्स पोजीशन’ मधून स्वतःभोवती तब्बल १८ वेळा फेऱ्या मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिने बनवला होता. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने क्षिप्राचा ‘शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला होता. हा महाराष्ट्र शासनाचा मोठा पुरस्कार मानला जातो. यावेळी क्षिप्राचे सर्वच स्तरातून मोठे कौतुक करण्यात आले होते. यासोबतच उत्तम कामगिरी करून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार तिने प्राप्त केली आहेत.

kshipra joshi with sister
kshipra joshi with sister

अनेक वर्षांच्या मेहनतीचे फलित म्हणून क्षिप्राने इंडियन रीदमीक जिम्नॅस्टिकच्या कॅप्टनपदाची धुरा सांभाळत असताना आज ती एक सिनिअर कोच म्हणून नावलौकिक करताना दिसत आहे. यातून नव्या पिढीला आपल्या अनुभवांची शिदोरी पोहोचवुन त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्याचा तीचा मानस आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट ऑलम्पिक गेम्स साठी तिला जज म्हणून बोलावण्यात आले होते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणाऱ्या क्षिप्रा जोशीच्या या यशस्वी कारकिर्दीचा सर्वांनाच अभिमान वाटावा असाच आहे. काही वर्षांपूर्वी तिने म्युजिक कंपोजर आणि साउंड डिझायनर असलेल्या कल्पेश मोरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आजही ती मुलींना जिम्नॅस्टिकचे धडे देताना पाहायला मिळते मधल्या महामारीच्या काळात देखील त्यांनी ऑनलाईन येऊन मुलींना जिम्नॅस्टिकचे काही सराव पद्धती आणि टिप्स दिलेल्या पाहायला मिळाल्या होत्या.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *