पु लं देशपांडे ह्यांना जाऊन आज अनेक वर्ष झाली पण त्यांचे व्हिडिओ ऑडिओ त्यावेळच्या पिढीला आणि आजच्या नव्या पिढीला ऐकल्याशिवाय राहवत नाही. दांडग्या लिखाणातून घडवलेली आणि स्वतःच्या मुखातून सुनावलेली हावभाव करून दाखवलेली त्यांची ती स्टाईल अजून कित्तेक पिढ्यान पिढ्या लोकांना नेहमी पाहावीशी आणि ऐकावीशी वाटेल. लिखाणात कुठेही अवाच्या भाष्य नाही पण पुणेरी टोमण्यातून घडलेली त्यांची लेखणी आपल्या सर्वाना पाठ्यपुस्तकापासूनच वाचायची आवड निर्माण झाली. अहो लिखाण कसलं जादूच म्हणा ना… साक्षात डोळ्यासमोर बटाट्याची चाळ, तो अंतू बरवा, कोकणातील घरे, त्यांनी लिहली तशी हुबेहूब डोळ्यासमोर उभी राहतात ह्याला जादू म्हणायचं नाही तर दुसरं काय?

पु लं देशपांडे ह्यांचा संपूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ह्यांना लोक भाई म्हणून हि ओळखायचे. ते फक्त एक लेखकच नाही तर शिक्षक, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार म्हणूनही तितकेच गाजले. पु लं देशपांडे ह्यांनी अनेक पुस्तके लिहली पण त्यांच्यावर लिहण्यासाठी अक्खी वही देखील कमीच पडेल. पु लं देशपांडे ह्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे ह्यांचा आज ९५ वा जन्म दिवस. आज आपण त्याच्या बद्दल बरच काही जाणून घेणार आहोत.. सुनीता देशपांडे ह्यांचं लग्ना आधीच नाव “सुनीता ठाकूर” असं होत. पु लं देशपांडे आणि सुनीता ठाकूर ह्यांचं लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. लग्नानंतर त्या सुनीता पुरुषोत्तम देशपांडे अर्थात सुनीताबाई म्हणून ओळखू लागल्या. अनेकांना हे माहित नसेल कि पु लं देशपांडे आणि सुनीताबाई ह्या दोघांनी ओरिएंटल हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून देखील काम केले होते. ‘नवरा बायको’ या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. राजमाता जिजाबाई’ हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या ‘सुदर मी होणार’ मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती. त्या एक उत्तम लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. “आहे मनोहर तरी” हे त्यांचं आत्म चरित्र खरंच वाचण्यासारखं आहे. त्यांचे स्वतःचे वेगळे विचार,निर्णयक्षमता, बोलण्यातला परखडपणा जाणवून येतो. भाईंचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे,पण माईंनी हि स्वतःच वेगळं अस स्थान साहित्य क्षेत्रात निर्माण केलं आहे. त्यासोबतच भाईंमधल्या अल्लड मुलाला त्यांनी मायेच्या धाकाखाली आयुष्यभर जपलं.

“सुनीता फार बुद्धिमान आहे, मॅक्ट्रिकला गणिताला तिला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले होते. नंतर बेचाळीसच्या चळवळीत गेली, संगिनी रोखून गोरे शिपाई समोर असताना मोर्चातील सर्व पळाले, ती एकदम ताठ उभी होती! तिला वजा केले, तर बाकी उरेल; पण चार लोकांची असते तशी. वारा प्यालेल्या वासरासारखी माझी अवस्था झाली असती. बंगल्यात राहिलो असतो. ए सी गाडीतून फिरलो असतो. बंगल्यासमोर नाना क्षेत्रातील कलावंतासमवेत मैफिली भरल्या असत्या. एकूण भोगाशिवाय कशाला स्थान राहिले नसते.” – पुलं (भाई आणि श्री ना पेंडसे यांच्या गप्पांमधून) भाई ना खऱ्या अर्थाने घडवणाऱ्या सुनीताबाईना त्यांच्या जन्म दिनानिमित्त वंदन …