Breaking News
Home / जरा हटके / लक्ष्मीकांत बेर्डे यांची चित्रपटातील ही हिरोईन ३१ वर्षानंतर पहा कशी दिसते

लक्ष्मीकांत बेर्डे यांची चित्रपटातील ही हिरोईन ३१ वर्षानंतर पहा कशी दिसते

डिसेंबर १९९० साली ‘कुलदीपक’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. डॉ श्रीराम लागू, दया डोंगरे, शेखर नवरे, सविता प्रभुणे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘स्मृती तळपदे ‘ हा नवा चेहरा लक्ष्मीकांत बेर्डेची हिरोईन बनून या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटानंतर स्मृती फारशा कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाल्या नाहीत मात्र लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्मृती या दोघांवर चित्रित झालेलं “इस्पिक, चौकट, किलवर, बदाम… तुझीच राजा होईल गुलाम…” हे गाणं त्याकाळी प्रेक्षकांच्या तोंडी गुणगुणल जायचं.

marathi actress smruti talpade in film kuldeepak
marathi actress smruti talpade in film kuldeepak

आज चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३१ वर्षे उलटली आहेत. त्यामुळे लक्ष्मीकांतसोबत झळकेलेली ही नायिका आता कशी दिसते याबाबत उत्सुकता निर्माण होते. जाणून घेऊयात याबाबत अधिक… कुलदीपक चित्रपटात स्मृती तळपदे यांनी कमल ची भूमिका साकारली होती. कमल ही किरणचा( सविता प्रभुणे) भाऊ राजा म्हणजेच लक्ष्याच्या प्रेमात पडते. या दोघांवर इस्पिक चौकट किलवर बदाम हे गाणं चित्रित झालं होतं. स्मृती तळपदे यांच्याबद्दल सांगायचे झाले तर कुलदीपक चित्रपटानंतर त्या अभिनय क्षेत्रात फारशा रमल्या नाहीत. अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्या आई आणि नृत्य शिक्षिका आशा जोगळेकर यांच्याकडून स्मृती तळपदे यांनी कथ्थकचे धडे गिरवले आहेत. नृत्यात निपुण असलेल्या स्मृती यांनी कालांतराने यातच आपले करिअर करायचे ठरवले. गेल्या कित्येक वर्षांपासून अंधेरी, मुंबई येथे त्यांची “नृत्य स्मृती” या नावाने डान्स अकॅडमी आहे. या अकॅडमीमधून त्यांनी अनेकांना नृत्याचे धडे दिले आहेत.

smruti talpade marathi film actress
smruti talpade marathi film actress

तर अनेक मंचावरून त्यांना आपल्या नृत्याची कला सादर करण्याची नामी संधी मिळाली आहे. त्यामुळे नृत्य क्षेत्रात त्यांचे नाव आज खूप पुढे असलेले पाहायला मिळते आहे. शिवाय ‘खगनिग्रह’ हा मराठी दोन अंकी नाटकाचे नृत्य दिग्दर्शनही त्यांनी केले होते २०१९ सालच्या झी नाट्य गौरव पुरस्कारात त्यांना गौरविण्यात आले होते. कधी काळी लक्ष्याची हिरोईन बनून मोठ्या पडद्यावर झळकणारी नायिका आज नृत्य क्षेत्रात आपले नाव लौकिक करताना दिसत आहे हे अनेकांना माहीत नसावे. कुलदीपक चित्रपटानंतर आज जवळपास ३१ वर्षानंतर त्यांना पाहिल्यास त्यांच्या दिसण्यात खूप मोठा फरक जाणवून येतो. परंतु चेहऱ्यावरचे त्यांचे तेज मात्र आजही तसेच अबाधित असलेले पाहायला मिळते आहे हे विशेष. कधी काळी अभिनय साकारणाऱ्या स्मृती तळपदे मालिका किंवा चित्रपटातून पुन्हा एकदा समोर आल्यास प्रेक्षकांनाही नक्की आवडेल… अभिनेत्री आणि उत्तम नृत्याकार स्मृती तळपदे याना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *