लकडी की काठी काठी का घोडा…हे गाजलेलं गाणं आहे १९८३ सालच्या “मासुम” या बॉलिवूड चित्रपटातलं. या गाण्यात जुगल हंसराज, उर्मिला मातोंडकर आणि आराधना श्रीवास्तव हे बालकलाकार झळकले होते. जुगल हंसराज याने राहुल, उर्मिला मातोंडकर हिने पिंकी तर आराधना श्रीवास्तवने मिनी ची भूमिका साकारली होती. चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास ३८ वर्षे लोटली आहेत. चित्रपटातील उर्मिला मातोंडकर आणि जुगल हंसराज हे कलाकार आजही वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून किंवा राजकारणाच्या माध्यमातून लोकांसमोर येत राहिले आहेत

मात्र ही मिनी या चित्रपटानंतर कुठे गायब झाली आणि ती सध्या काय करते याबाबत आज बरेच प्रेक्षक अनभिज्ञ आहेत. या मिनीबाबत आज अधिक जाणून घेऊयात…. मासुम चित्रपटातली मिनी म्हणजेच बालकलाकार आराधना श्रीवास्तव ही बॉलिवूडची चाईल्ड आर्टिस्ट म्हणून आजही ओळखली जाते. मासुम चित्रपटाव्यतिरिक्त तिने खुदा हाफिज, राम तेरे कितने नाम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यामुळे एक चाईल्ड आर्टिस्टचा शिक्का आराधना वर देखील पडला होता. असे बरेचसे बॉलिवूडचे चाईल्ड आर्टिस्ट मोठेपणी मात्र चंदेरी दुनियेपासून गायब झाले. त्यातील बहुतेकांना म्हणावे तसे यश मिळालेही. आज आराधना कुठे आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात, एका मुलाखतीत आराधनाने स्वतः खुलासा केला होता की..बॉलिवूडच्या या दोन तीन चित्रपटानंतर मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कानपूरला गेले होते. तिथून पुढे पुण्यातील सिम्बॉइसिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आणि आयटी क्षेत्रात नोकरीही केली. गायनाची आवड तिला पहिल्यापासूनच होती त्यामुळे यात तिने मास्टर्स आणि पीएचडी करण्याचे ठरवले.

आराधनाचे लग्न झाले असून आपली मुलगी यशेता जेव्हा ५ वर्षांची होती तेव्हा तिने आपल्या लाडक्या लेकीसाठी ‘लकडी की काठी…’ हे गाणं गाऊन तिला खुश केलं होतं. त्यावेळी मिडियासोबत तिने गिटार वाजवतानाचा हा फोटो शेअर केला होता. आज इतक्या वर्षानंतर आराधना श्रीवास्तव बॉलिवूडपासून खूप दूर असली तरी गायनाची आवड ती आजही जोपासताना दिसत आहे. उर्मिला मातोंडकर, जिमी शेरगिल हे कलाकार बॉलिवूड मध्ये जम बसवताना दिसले मात्र आराधना या गोष्टीला अपवाद ठरली. एक बालकलाकार म्हणून यश मिळालेले कलाकार पुढे जाऊन वेगळ्याच क्षेत्रात आपले करिअर घडवताना दिसतात हे आराधनाने दाखवून दिले. एक चाईल्ड आर्टिस्ट, आयटी क्षेत्रात नोकरी आणि आता एक संगीत शिक्षिका अशी वेगळी ओळख ती निर्माण करताना दिसली. आराधना श्रीवास्तवला तिच्या या वेगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा….