सध्या मराठी सृष्टीत अनेक कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. रसिका सुनील, सुयश टिळक, सिद्धी पाटणे हे कलाकार काही दिवसांपूर्वी विवाहबद्ध झाले तर लवकरच अभिनेत्री सई कल्याणकर विवाहबद्ध होत आहे. कुसूम मालिकेत वेदांगी कुलकर्णी हिने कुसुमच्या वहिनीची भूमिका साकारली आहे. वेदांगी कुलकर्णी हिच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून लग्नसराई सुरू झाली आहे. संगीत सोहळ्यामध्ये वेदांगीने गाण्यावर नृत्य सादर केले होते तर तिच्या सह तिचा होणारा नवरा देखील तिच्यासोबत ठेका धरताना दिसला. मेहेंदीचा सोहळा आणि संगीत सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून हळदीच्या सोहळ्याचे काही खास फोटो वेदांगीने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

१९ मार्च २०२१ रोजी वेदांगी कुलकर्णी आणि अभिषेक तिळगुळकर यांनी एंगेजमेंट केली होती आणि आज २० नोव्हेबर २०२१ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. हे त्यांचं अरेंज मॅरेज आहे तिचा नवरा अभिषेक तीळगूळकर हा पेट्रोलियम इंजिनिअर असून ऑस्ट्रेलियातुन त्याने एमबीएच शिक्षण घेतलं आहे. वेदांगी कुलकर्णी ही अभिनेत्री तसेच उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. अनेक मोठ्या मंचावर तिने आपल्या नृत्याची अदाकारी सादर करून बक्षिसे मिळवली आहेत. आज वेदांगी बद्दल आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊयात…वेदांगी कुलकर्णी ही मूळची मुंबईची डहाणूकर कॉलेज आणि डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. वेदांगी मुंबईत “व्हिक्टोरियस डान्स अकॅडमी” चालवत असून यामधून तिने अनेकांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. स्टार प्रवाह वरील “साथ दे तू मला” या मालिकेतून प्राजक्ताची प्रमुख भूमिका तिने साकारली होती. याशिवाय झी युवा वरील ‘सूर राहू दे’ मालिकाही तीने अभिनित केली आहे. लंडनच्या आजीबाई, मऊ, छडा, लौट आओ गौरी, बिलिव्ह इन सारख्या नाटक तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे.

एवढेच नाही तर अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर तिने झी वाहिनीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रियालिटी शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. या शोमधून वेदांगीने आपल्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या रियालिटी शो नंतर तीला अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मिळाली होती. मालिकांमधून सहनायीका साकारत असतानाच “साथ दे तू मला ” या मालिकेतून प्रमुख भूमिका साकारण्याची नामी संधी तिच्याकडे चालून आली. या भूमिकेमुळे वेदांगीला खरी प्रसिद्धी मिळाली होती. वेदांगीच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून लगीनघाई सुरू झाली आहे साखरपुड्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी वेदांगी आणि अभिषेक विवाहबद्ध होत आहेत. मेहेंदीचा सोहळा, संगीत सोहळा तसेच हळदीच्या सोहळ्यात अनेक मित्र मंडळींना त्यांनी आमंत्रित केले होते. या सोहळ्याचे खास क्षण तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हळदीच्या वेळी वेदांगीने पिवळया रंगाचा ड्रेस घातला होता त्यात तिचे रूप अधिकच खुलून दिसत होते. वेदांगी कुलकर्णी आणि अभिषेक तिळगूळकर यांना आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…