लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्याच नुकतंच झालं लग्न पत्नी आहे डेंटिस्ट आणि २०१९ सालीची मिस महाराष्ट्र

आज सुंदरा मनामध्ये भरली मालिका अभिनेता कुणाल धुमाळ डॉ सोनाली काजबे सोबत विवाहबद्ध झाला आहे. या लग्नाला गार्गी फुले, आशा शेलार यांनी खास हजेरी लावली होती. फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी कुणाल आणि सोनाली यांचा साखरपुडा पार पडला होता. साखर पुड्यानंतर आज त्यांचे थाटात लग्न झाले. सोनाली काजबे ही २०१९ साली मिस महाराष्ट्र बनण्याचा मान तिने पटकावला होता. त्यानंतर डेंटिस्ट म्हणून ती सध्या चर्चेत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली, शेर शिवराज, पिंकीचा विजय असो, पावनखिंड अशा चित्रपट मालिकांमधून कुणाल धुमाळने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. कुणालने नुकतेच लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अनेक सेलिब्रिटींनी त्याचे व सोनालीचे अभिनंदन केले आहे. अक्षया नाईक, अंबर गणपुळे, गार्गी फुले, आशा शेलार, तन्वी मुंडले, संग्राम समेळसह अनेक कलाकारांनी कुणाल व सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत.