Breaking News
Home / जरा हटके / वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी करोडपती बनलेला हा चिमुरडा आज आहे आयपीएस अधिकारी

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी करोडपती बनलेला हा चिमुरडा आज आहे आयपीएस अधिकारी

कौन बानेगा करोडपती ह्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यातून अगदी मोजक्याच स्पर्धकांना हॉट सीटवर बसण्याचा मान मिळतो. गेल्या २१ वर्षांपासून या शोचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत मध्यंतरी शाहरूख खानने देखील या शोची धुरा सांभाळली होती. मात्र अमिताभ बच्चन यांच्याइतकी छाप त्याला सोडता आली नाही. हिंदी शोच्या प्रसिद्धीनंतर मराठीतही कोण होणार करोडपती हा शो सुरू करण्यात आला. सचिन खेडेकर या शोची धुरा समर्थपणे पेलताना दिसत आहेत. २००० साली कौन बनेगा करोडपती या शोचा पहिला सिजन प्रसारित करण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच १४ वा सिजन सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ravi saini in kbc junior
ravi saini in kbc junior

या शोमध्ये प्रथम एक करोड जिंकण्याचा मान मराठमोळ्या हर्षवर्धन नवाथे यांनी पटकावला होता. मराठी मालिका अभिनेत्री सारिका नवाथे या हर्षवर्धन नवाथे यांच्या पत्नी आहेत हे बहुतेकांना आता चांगलेच परिचयाचे झाले आहे. वेगवेगळ्या पर्वात अनेक मोठे बदल घडून येतात कोरून बनेगा करोडपती नंतर या शोमध्ये ५ कोटींचा देखील धनादेश ठेवण्यात आला. २००१ साली ‘केबीसी ज्युनिअर’ या पर्वात एका चिमुरड्याने १ कोटी जिंकण्याचा मान पटकावला होता. आज हा चिमुरडा आयपीएस अधिकारी बनला आहे. १५ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन रवी सैनी याने १ कोटी रुपये जिंकले होते. १४ वर्षांचा रवी सैनी शालेय शिक्षणात देखील खूपच हुशार होता. केबीसी मध्ये येण्याचं त्याचं धैय्य होतं. या शोमध्ये हॉट सीट मिळताच त्याने एकेक प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन अवघ्या १४ व्या वर्षीच करोडपती होण्याचा मान पटकावला. बारावी नंतर जयपूर येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून त्याने एमबीबीएस चं शिक्षण घेतलं. सोबतच त्याने या क्षेत्रात नोकरी देखील केली. २०१२ साली यूपीएससी ची परीक्षा दिली मात्र यात त्याला यश मिळालं नाही.

ravi saini adhikari
ravi saini adhikari

पुढे पुन्हा प्रयत्न करून केंद्रिय लोकसेवा आयोगाची परीक्षेत यश मिळवलं. वडील नौदलाच्या सेवेत असल्याने आपणही देशसेवा करण्याच्या हेतूने त्याने आपली एकेक पाऊले पुढे टाकली. २०१४ साली स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशात ४६१ वा क्रमांक पटकावला आणि आयपीएस बनून पाठीवर कौतुकाची थाप मारून घेतली. कौन बानेगा करोडपती या शोचा १४ वा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय खास पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता आहे. या आगामी शोमुळेच आज रवी सैनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर करोडपती बनलेल्या रवी सैनी बद्दल जाणून प्रेक्षक त्याचे कौतुक करत आहेत. सोबतच येणाऱ्या १४ व्या सिजनमध्ये सहभागी होण्यासाठी देखील प्रेक्षकांचे प्रयत्न चालू आहेत.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *