झी मराठीवर किचन कल्लाकार हा नवा रिऍलिटी शो प्रसारित करण्यात येत आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात येते. सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, संदीप पाठक, अभिजित सावंत, सोनाली कुलकर्णी, आकाश ठोसर, नागराज मंजुळे, विजय पाटकर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनि आतापर्यंत या शोमध्ये हजेरी लावली आहे. पदार्थ बनवत असताना ह्या कलाकारांमध्ये उडालेला गोंधळ शोमधून प्रेक्षकाना पाहायला मिळत आहे. बुधवारी आणि गुरुवारी हा शो रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे मात्र ह्या शोमध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीला काही बदल केले आहेत.

राज शेफ म्हणून झी मराठी वर किचन कल्लाकर मध्ये काम करताना जयंती कठाळे पाहायला मिळतात. मराठी जेवणाला ग्लॅमरस आणि आंतरराष्ट्रिय स्थान मिळावा.. त्या निमित्ताने संपुष्टात आलेले पदार्थ पुन्हा एकदा सगळी कडे विकले जातील आणि बनवलेही जातील व हक्काने मागितले जातील.. मग तडजोड करायची गरज नाही असं म्हणत त्यांनी देश विदेशात मराठी हॉटेल्सच्या अनेक शाखा उभारल्या. यामुळेच किचन कल्लाकर मध्ये त्यांना घेतलं गेलं. अस्सल मराठी पदार्थ आणि त्या बनवायच्या पद्धती त्यांच्याहून चांगल्या प्रकारे क्वचितच एखाद्याला माहित असाव्यात. पण शोमध्ये जयंती कठाळे या मार्गदर्शक म्हणून जबादारी सांभाळत होत्या त्यांच्या जागी आता मधुराज रेसिपीच्या सर्वेसवा “मधुरा बाचल” यांची या शोच्या मार्गदर्शक म्हणून काही भागांसाठी वर्णी लागणार आहे. साधारण दोन भागांसाठी किचन कल्लाकार या शोच्या मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावताना दिसणार आहेत. या नंतर पुन्हा जयंती कठाळे याच राज शेफ म्हणून पाहायला मिळतील मधुराज रेसिपी हे त्यांचं युट्युब चॅनल आहे त्यावर त्यांनी बनवलेल्या पदार्थांचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

मराठी , हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातून त्या आपल्या फॉलोअर्सशी संवाद साधत असतात. त्यामुळे केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर परदेशात देखील त्यांच्या व्हिडीओला आणि रेसिपीजला पसंती मिळाली आहे. याशिवाय त्यांच्या नावाचा मसाल्यांचा ब्रँड देखील बाजारात उपलब्ध आहे. आता लवकरच मधुरा बाचल किचन कल्लाकार या शोमधून टीव्ही माध्यमातून देखील प्रसिद्धी मिळवताना दिसणार आहेत. नवीन वर्षात काहीतरी खास म्हणून बुधवारी किचन कल्लाकारचा स्पेशल एपिसोड असणार आहे. या एपिसोड मध्ये राजकारणातील मान्यवरांना बोलावण्यात आले आहे. पंकजा मुंडे, रोहित पवार, प्रणिती शिंदे या तिघांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावून पदार्थ बनवून दाखवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या एपिसोडची उत्सुकता महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना निश्चितच लागून राहिली असणार. सर्व पक्षीय नेतेमंडळी किचन कल्लाकरच्या किचनमध्ये राजकारणाव्यतिरिक्त कुठले पदार्थ शिजवणार हे पाहायला मिळणार आहे. किचन कल्लालारच्या नव्या मार्गदर्शक मधुरा बाचल यांना या मालिकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा …