काही दिवसांपासून झी मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या किचन कल्लाकर या शो ने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे. खुपच कमी दिवसात मोठा चाहतावर्ग ह्या शो ला लाभला आहे. खरतर किचन शो म्हटलं तर शो प्रक्षेपणाला दुपारची वेळ दिली जाते पण ह्या शोला प्राईम टाईमवर ठेऊन त्यांनी मोठी जोखीम पत्करली होती पण म्हणतात जिथे जोखीम आहे तिथे यश देखील तितक्याच लवकर संपादन करता येत. अगदी तसंच ह्या शो बाबतीत देखील घडलं आहे. महाराज म्हणून प्रशांत दामले ह्या सोहळ्यात जज म्हणून काम पाहतात तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ह्या शो च सूत्रसंचालन करताना पाहायला मिळतो. आजच्या भागात संकर्षण कऱ्हाडे याने एक कारण सांगून मालिकेतून काही काळ बाहेर जाण्याची अनुमती मागितली आहे.

संकर्षण कऱ्हाडे आजच्या शो च्या शेवटी महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांची अनुमती मागत म्हणतो ” महाराज माझ्या घशात खवखव होत आहे. त्यामुळे मला काही दिवसांसाठी रजा हवी आहे. माझ्या जागी अभिनेत्री श्रेया बुगडे हि कार्यभार सांभाळेल तरी मला तुम्ही काही विश्रांतीसाठी रजा द्यावी” संकर्षणाच्या ह्या बोलण्यावर महाराज त्याला अनुमती देत त्यांनी अभिनेत्री श्रेया बुगडेला पुढे येणाऱ्या काही भागासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच किचन कल्लाकर शो मध्ये श्रेया बुगडे देखील आली होती. तिला खाद्य स्पर्धांबद्दल विशेष काही माहित नसल्याचं दिसून आलं. पण ती एक उत्तम सूत्र संचालक आहे. अनेक अवॉर्ड शो मध्ये तिने याआधी देखील सूत्रसंचालन केलं आहे. चला हवा येऊ द्या शो सांभाळत ती किचन कल्लाकर मध्ये देखील आता कल्ला करायला सज्य झाली आहे. किचन कल्लाकर ह्या शो मध्ये हा काही पहिला बदल नाहीये. राज शेफ म्हणून जयंती कठाळे ह्या देखील काही दिवसांसाठी बाहेर गेल्या असल्याकारणामुळे त्यांच्याजागी मधुराज रेसिपी च्या मधुरा बाचल यांची वर्णी लागलेली पाहायला मिळते.

आता पुन्हा जयंती कठाळे ह्या किचन कल्लाकर शो मध्ये राजशेफ म्हणून कार्यभार सांभाळताना पाहायला मिळणार आहेत. याच प्रमाणे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे देखील काही दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा सूत्रसंचालन करताना पाहायला मिळतील. माझी तुझी रेशीमगाठ हि त्याची सुरु असलेली मालिका सर्वांची आवडीची मालिका आहे. याच मालिकेसोबत “तू म्हणशील तस ” हे नाटक देखील संकर्षण कऱ्हाडे करताना पाहायला मिळतो. त्याच हे नाटक देखील खूपच गाजलेलं आहे एकामागून एक नाटकांचे प्रयोग मालिका आणि आता नव्याने किचन कल्लाकर मालिकेचे सूत्रसंचालण ह्या सर्व बीजी शेड्युलमुळे विश्रांतीसाठी त्याने हा निर्णय घेतला असावा. संकर्षण कऱ्हाडे ह्याच्या सूत्रसंचालनामुळेच किचन कल्लाकर शो पाहायला खरी मजा येते त्यामुळे तो लवकरात लवकर शो मध्ये पुन्हा येऊन कार्यभार सांभाळेल अशी आशा करूयात.