किचन कल्लाकार या कार्यक्रमाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील खवय्यांना वेड लावलं आहे. अशात दररोज नवनवीन मेजवानीसाठी सज्ज असलेल्या या शोमधील एका कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे. आता हा कलाकार नेमका कोण आहे? त्याला कोरोनाची लागण कशी काय झाली या विषयीची माहिती या बातमीतून जाणून घेऊ… प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांना कोरोनाची लागण असल्याचे समोर आले आहे. प्रशांत दामले यांनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

अभिनेते प्रशांत दामले म्हणतात की, “मला कोरोना झालाय असं सांगितलं. इतकंही काळजी करण्यासारखा नाही कारण मी काठावर पास झालोय शाळेतही काठावर पास व्हायचो आणि आजही काठावर पास झालोय.” असं विनोदी कॅप्शन देत त्यांनी चाहत्यांना ही बातमी सांगितली आहे. “काळजी करण्यासारख काही नाही मला ७ दिवस घरामध्येच राहायलासांगितलं होत. मला एवढं जास्त काही झालंच नव्हतं थोडीशी सर्दी झाली होती म्हणून चाचणी करुन घेतली तर मी काठावर पास झालो म्हणायला हरकत नाही आणि मी आता ठणठणीत बारा ही झालोय. आमचे नाटकाचे दवरे चालू होते त्यामुळे माझ्या सोबतचे सगळे निगेटिव्ह आले त्याच्यामुळे आता मी लवकरच कामाला सुरवात करणार आहे.”, असं देखील पुढे ते म्हटले आहेत. काही दिवसांपूर्वी किचन कल्लाकर हा शो झी मराठीवर प्रदर्शित झाला आहे. खूप कमी कालावधीत प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. “को’ वि’ ड ला टक्कर देत 450 प्रयोग झाले आता तुमच्या साथीने 500 कडे झेप शेवटी गोष्ट आहे ही लग्नाची ती कशी थांबेल नवीन वर्षाची सुरवात खळखळून हसून करा म्हणजे संपूर्ण वर्ष आनंदात जाईल.”

यात संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालकाची तर प्रशांत दामले हे परिक्षकाची भूमिका निभावत आहेत . तर मार्गदर्शन म्हणून जयंती कठाळे मॅडम पाहायला मिळत आहेत . या शोमध्ये वेगवेगळे कलाकार बोलावून त्यांच्याकडून प्रशांत दामले यांनी दिलेले पदार्थ बनवायला सांगतात . पदार्थाबरोबर कॉमेडी देखील पाहायला मिळते. कलाकारांकडून पदार्थ बनवताना उडालेला गोंधळ पाहून सगळ्यांनाच हसू आवरत नाही . आतापर्यंत बऱ्याच कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावलेली पाहायला मिळाली . श्रेया बुगडे ,प्रार्थना बेहरे ,तेजस्विनी पंडित , आदिनाथ कोठारे अशा बऱ्याच कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावलेली पाहायला मिळाली. स्वयंपाक बनवताना झालेल्या गमती जमती देखील सगळ्यांबरोबर शेयर केल्या. असो अभिनेते प्रशांत दामले याना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…