झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार शो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या आवडीचा आणि चर्चेचा भाग बनला. अनेक मराठी कलाकार मंडळी या शो च्या निमित्ताने सेटवर येऊन मराठी खाद्य पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतात. कलाकारांकडून खाद्य पदार्थ बनवण्याचा हा शो दरवेळी नवनवीन कलाकार आणि नवनवीन खाद्य पदार्थ त्यामुळे कलाकारांची उडालेली धांदळ यामुळे शो खुपच रंजक बनतो. किस्से गप्पागोष्टी आणि अनुभव त्यासोबत रुचकर खाद्यपदार्थ हे सगळं काही जुळवून घेण्यात किचन कल्लाकार शो ला मोठं यश मिळालेलं पाहायला मिळत आहे.

किचन कल्लाकार शो मध्ये राजशेफ म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या जयंती कठाळे या सर्व परिचित आहेतच. देश विदेशात आपले मराठी रुचकर पदार्थ मराठी लोकांसोबत परदेशी लोकांना खायला घालण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आयटी क्षेत्रात गडगंज पगाराची नोकरी सोडून त्यांनी “पूर्णब्रम्ह” ची स्थापना केली. आज त्यांच्या हॉटेल्सच्या देश विदेशात अनेक शाखा आहेत. मराठी जेवणाला ग्लॅमरस आणि आंतरराष्ट्रिय स्थान मिळवण्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे. याच कारणामुळे त्यांची किचन कल्लाकार शो मध्ये वर्णी लागली. आपल्या सहज सोप्या भाषेत ते कलाकारांना चांगलं समजावून पदार्थ करताना तो अधिक रुचकर कसा होईल हे सांगतात. त्यांची समजावण्याची पद्धत खूपच चांगली आहे यातून त्या एक उत्तम सुपरव्हिजन करतात हे दिसून येत. नुकतंच नवीन वर्ष २०२२ च आगमनानिमित्त त्या परिवारासोबत परदेशी गेल्या असल्या कारणामुळे त्यांना हा शो काही काळ करता आला नाही. या कारणामुळेच त्यांच्या जागी मधुराज रेसिपी च्या मधुरा बाचल याना घेण्यात आलं होत.

किचन कल्लाकार शो चे गेले २-३ एपिसोड राजशेफ म्हणून मधुराज रेसिपी च्या मधुरा बाचल यांची वर्णी लागली होती. पण आता आपली परदेशी वारी करून आल्यावर पुन्हा जयंती कठाळे याच शो मध्ये पाहायला मिळणार आहेत. येत्या भागात तुम्हाला किचन कल्लाकार शो राजशेफ म्हणून पुन्हा जयंती कठाळेच पाहायला मिळणार आहेत. कलाकारांसोबत त्यांची बोलण्याची पद्धत आणि समजावून सांगणं त्यांना चांगलं जमतं याचा कलाकारांना खाद्य पदार्थ बनवण्यात मोठा फायदा होतो. खरंतर ह्या महामारीच्या काळात पुरुष मंडळी देखील घरात महिलांसोबत जेवण बनवताना ट्राय जाताना पाहायला मिळाली अगदी त्याचप्रमाणे अभिनेते देखील किचनमध्ये काम केल्याचं ह्या मंचाद्वारे सांगताना पाहायला मिळतात. अभिनेते प्रशांत दामले अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत जयंती कठाळे यांच्या आगमनाने शो मध्ये आणखीनच रंग चढेल यात शंका नाही. किचन कल्लाकार शो च्या राजशेफ जयंती कठाळे यांना पुनरागमनाची खूप खूप शुभेच्छा…