कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांना अनेकांनी आठवण करून दिली ती तुकाराम महाराजांच्या गुळाच्या कथेची

युवा कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांनी त्यांच्या कीर्तनातून मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. पण टीव्ही रिऍलिटी शो बिगबॉस मराठी ३ मध्ये गेल्याने त्या बऱ्याच ट्रोल झाल्या. अनेकांनी शिवलीलांवर नाराजी दर्शवली म्हणून कि काय आजारी असल्याचं सांगून त्या बिगबॉसच्या घरातून बाहेर देखील पडल्या. नुकतीच मीडियासमोर त्यांनी त्याबाबात सारवासारव करत माफी देखील मागितली. ह्यावर अनेकांनी शिवलीला ह्यांना तुकाराम महाराजांची गुळाच्या कथेची आठवण करून दिली. काय होती ती गुळाची कथा जाणून घेऊयात…

संत तुकाराम महाराज समाज प्रबोधनाचे काम करत होते. कसं वागावं काय करावं काय करू नये हे आपल्या अभंग आणि ओवीतून समाजाला शिक्षित करायचे. एक महिला आपल्या मुलाला घेऊन तुकाराम महाराज्यांकडे गेली आणि म्हणाली कि माझा मुलगा सारखा गूळ खातो कितीही वेळा त्याला सांगितलं कि गूळ जास्त खाणं चांगलं नाही तरीही तो कोणाचं ऐकत नाही तुम्हीच त्याला सांगितलं तर तो तुमचं नक्की ऐकेल. ह्यावर संत तुकाराम महाराज त्या महिलेला म्हणतात कि माऊली ह्या मुलाला घेऊन तुम्ही १५ दिवसांनी माझ्याकडे या. ती महिला त्यांच्या म्हणण्यानुसार मुलाला घेऊन १५ दिवसांनी पुन्हा तुकाराम महाराज्यांकडे जाते. त्यावेळी त्या मुलाला तुकाराम महाराज म्हणतात कि जास्त गुळ खाणे शरीराला चांगलं नाही. ह्यावर त्या मुलाची आई तुकारामांना म्हणते कि फक्त तुम्ही गूळ खाऊ नकोस एवढं सांगण्यासाठी आम्हाला १५ दिवसांनी का बर बोलावल. तेंव्हाही तुम्ही हे सांगू शकला असता. तर तुकाराम त्या महिलेला सांगतात. माऊली मी देखील गूळ खायचो मग मी त्याला सांगणं हे त्यावेळी योग्य नव्हतं. आता ह्या १५ दिवसांत मी गूळ खाणं पूर्णपणे बंद केलं आहे आणि त्यामुळेच मी तुमच्या मुलाला असं सांगू शकलो. जर मी गूळ खाऊन त्याला न खाण्याचा सल्ला देत असेल तर माझ्या त्या सल्याला काहीच अर्थ राहिला नसता. पूर्वी भिक्षा मागताना देखील शास्त्रानुसार ३ घरातच भिक्षा मागायची अनुमती होती. मग त्यांना भिक्षा मिळाली नाही तरी ते पुढे न जात त्यादिवशी उपाशी पोटीच दिवस काढायचे. आपण शास्त्र शिकवतो मग त्याच पालन आपण केलंच पाहिजे ह्याच हे उत्तम उदाहरण आपल्याला सुदाम्याच्या कथेतून पाहायला मिळत.

समाज प्रबोधन करण साधं काम नाही. आजकाल पैश्यांच पाकीट पाहून कीर्तने केली जातात. शिवलीला पाटील माफी मागताना कीर्तनकार इंदुरीकर महाराज्याना आपले गुरु मानतात. इंदुरीकर महाराज कीर्तन करताना काही विधानांमुळे अडचणीत देखील आलेले पाहायला मिळाले. पण कान उघाडणी करताना असे शब्द येऊ शकतात त्यात वाईट असं काहीच नाही. कीर्तनाशिवाय ते अनाथ मुलांसाठी शाळा देखील चालवतात हे अनेकांना माहित असेल. कीर्तन संल्यावर ते एक सामान्य माणसाप्रमाणे पाहायला मिळतात. अगदी कीर्तन करताना देखील ते हाथ जोडून मगच एखाद विधान करतात हि त्यांची शैली सर्व परिचित आहे. अगदी हातात खराटा घेऊन ते आपल्या गो शाळेत जनावरांची सेवा करतानाचे अनेक फोटो देखील तुम्ही नक्कीच पाहिले असतील. ह्या सर्व कीर्तनकार इंदुरीकर महाराज्यांच्या जमेच्या बाजू आहेत ते एक उत्तम व्यक्ती आणि उत्तम वक्ते आहेत हे ह्यावरून पाहायला मिळत. शिवलीला ताईंनी बिगबॉसच्या घरात जाऊन काहीच वाईट केलं नसलं तरी लोकांच्या मनात कीर्तनकारांबद्दल आदर आहे हे विसरून चालणार नाही. आणि माफी मागून तुम्ही पुढे चालत राहा आणि स्वतः देखील आचरणात आणा इतकीच अपेक्षा लोकांच्या मनात आहे. वाल्याचाही वाल्मिकी झालेला पाहायला मिळाला आहे. शिवलीला ह्यांना महाराष्ट्रातील जनता नक्कीच माफ करेल ह्यात तिळमात्र शंका नाही.