Breaking News
Home / जरा हटके / शेवटी ती बाहेर पडलीच.. कीर्तनकार शिवलीला पाटील हिने या कारणामुळे बिगबॉस ३ च घर सोडलं

शेवटी ती बाहेर पडलीच.. कीर्तनकार शिवलीला पाटील हिने या कारणामुळे बिगबॉस ३ च घर सोडलं

मराठी बिग बॉसचा ३ रा सिजन सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत मात्र या घरात सततच्या वादामुळे प्रेक्षकांनी बिग बॉसचा शो धारेवर धरला आहे. दरम्यान काही टास्कमध्ये दादूस , विकास पाटील, आणि विशाल निकम यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. तर लवकरच एका सदस्याने या घरातून काढता पाय घेतला आहे. ही सदस्य आहे ‘शिवलीला पाटील’. कीर्तनकार शिवलीला पाटील नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाली आहे. सुरुवातीपासूनच शिवलीला पाटील यांच्या शोमध्ये येण्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेकांना तिचे या घरात येणे पटले नव्हते. तू कीर्तनकार आहेस मोह माया पासून तू राहावे आणि ज्यात प्रसिद्धी मिळवली त्यातच समाधान मानावे अशी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली होती. याच कारणाने अनेकांच्या ट्रोलिंगला देखील तिला सामोरे जावे लागत आहे.

shivlila patil bigboss exit
shivlila patil bigboss exit

मात्र अशातच शिवलीला बिग बॉसच्या घरातून प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाहेर पडली आहे. मागील काही दिवसांपासून शिवलीला बिग बॉसच्या घरात राहून कुठल्याही टास्कमध्ये सहभागी झाली नव्हती. प्रकृती अधिकच खालावल्याने तिने बिग बॉसला घरातून बाहेर निघण्याची विनंती केली होती. तिच्या या विनंतीला मान्यता देऊन बिग बॉसने तिला घराबाहेर निघण्याची परवानगी दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात असताना तिने इतर सदस्यांप्रति मत व्यक्त केले होते. हा खेळ मला अजूनही समजला नाही असे ती त्यावेळी म्हणाली होती. मी ह्या घरातून बाहेर जाईल त्यावेळी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्ही सगळेजण माझी आठवण काढतील , असे ती म्हणाली होती. शिवलीला घरात असताना प्रेक्षकांच्या नाराजीमुळे खूपच उदास झाली होती. ह्या घरात राहून आपण कसं वागावं हेच तिला समजत नव्हते असे बोलताना तिला आपले अश्रू देखील अनावर झाले होते. एक कीर्तनकार अशा घरात कशी जाऊ शकते म्हणत तिच्या विरोधात अनेकांनी तिला उलटसुलट बोलण्यास सुरुवात केली होती. बिग बॉसच्या घरातून ती आजारी असल्याचे कारण सांगून बाहेर जरी पडली असली तरी काही दिवसांनी तिचे पुनरागमन होईल कि नाही यावर आता शंका व्यक्त केली जात आहे. कारण बाहेर निघाल्यावर तिच्या चाहत्यांच्या नाराजीमुळे ती नक्कीच या गोष्टींचा विचार करणार हे नक्की. परंतु ती ह्या घरात परत यावी अशी अनेकांची ईच्छा आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *