आपल्या कीर्तनातून आज संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतं प्रबोधन करणारे कीर्तनकार म्हटल की, पटकन इंदुरिकर महाराज यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आजवर त्यांनी आपल्या विनोदी कीर्तनातून अनेकांची डोकी ठिकाणावर आणली. मात्र आता त्यांनी अचानक आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. काय आहे या मागचं कारण? हेच या बातमीमधून जाणून घेणार आहोत. इंदूरीकर महाराजांची मोठी ख्याती आहे गावोगावी जाऊन त्यांनी केलेली कीर्तने लोकांच्या नेहमीच आठवणीत राहतात. हि बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी निराशा देणारी आहे.

काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात वाहन चालक जखमी झाला. यावेळी इंदुरीकर महाराजांना काही दुखापत झाली नव्हती. त्यांची गाडी एका लाकडाच्या ट्रॉलीला धडकल्याने हा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांना काही झाले नसले तरी, मात्र आता त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले. प्रकृती ठीक नसल्यानेच त्यांनी ३० मे पर्यंतचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांना नक्की काय झालय हे स्पष्ट झाले नसून फक्त प्रकृती अचानक बिघडली असं सांगण्यात येत आहे. पण यावर विशेष काळजी करण्यासारखं काही नसून त्यांना काही दिवस विश्रांती मिळावी यासाठी काही दिवसांवर येऊन ठेपलेले पुढील कार्यक्रम आता ते काही काळ करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ह्यावर चाहत्यांनी आणखीन चिंता करू नये असं देखील म्हटलं जातंय.

त्यांच्या चाहत्यांच्या मनात आणखीन काही शंका येऊ नये म्हणून त्यांनी स्वतः या बाबत एक पत्रक जारी केलं आहे. इंदूरीकर महाराज यांनी आजवर आपल्या कीर्तनातून खूप प्रबोधन केले. सहसा कीर्तनाला वयोवृध्द मंडळी जात असतात. मात्र आपल्या बोलण्याच्या थोड्या खट्याळ शैलीने त्यांनी तरुणाईला देखील स्वतः कडे आकर्षित केले. सोशल मीडियावर त्यांच्या अनेक क्लिप्स देखील व्हायरल होऊ लागल्या आणि पाहता पाहता एक कीर्तनकार महाराज सेलिब्रिटी झाले. या सर्वांमध्ये त्यांच्या कधी खोचक तर कधी विनोदी बोलण्यातून काहींची मने देखील दुखावली गेली. मात्र कुणाच्या भावना दुखावल्यास त्यांनी वेळप्रसंगी अनेकांची माफी देखील मागितली. अशात आता त्यांचे पुढील कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठी चिंता लागली आहे.