देवमाणूस फेम अभिनेता या दिवशी अडकणार लग्नबांधनात पण खरंच ते लग्न करणार की? गोलमाल है भाई सब गोलमाल है
देवमाणूस, लागीरं झालं जी अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला किरण गायकवाड लवकरच लग्नबांधनात अडकणार आहे. काहीच दिवसांपूर्वी किरण गायकवडने “आणि ती हो म्हणाली” अशा हॅशटॅगची पोस्ट करून अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले होते. त्यांच्या या फोटोंवर सेलिब्रिटींनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे अनेकजण आवक होऊन त्यांच्या या बातमीवर अभिनंदनाचा वर्षाव करू लागले. यानंतर किरणने त्याच्या सेलिब्रिटी मित्रांची भेट घेतली होती. तेजपाल वाघ, निखिल चव्हाण हे सेलिब्रिटी त्याच्या पार्टीला हजर राहताना दिसले होते. त्यावेळी “वेडिंग बेल” म्हणत लग्नाची घंटा वाजली म्हणत त्यांनी किरणच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला.
त्यापाठोपाठ आता आज किरणसह वैष्णवीने सेव्ह द डेट म्हणत “१४ डिसेंबर” ही तारीख जाहीर केली आहे. आता या तारखेवरून दोघेही साखरपुडा किंवा लग्न करणार अशी एक चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच या दोघांच्या लग्नाचा बार उडणार असे चित्र त्यांनी त्यांच्या चाहत्यांसमोर उभ केलं आहे. दरम्यान हे लग्न व्हावं ही तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे. पण यामध्ये एक वेगळी कुजबुज देखील पाहायला मिळत आहे. हा सर्व खटाटोप त्यानी लक्ष वेधून घेण्यासाठी तर नाही ना केला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण याअगोदर किरण गायकवाडने झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या “टोटल हुबलक” या मालिकेसाठी असा लग्नाचा घाट घातला होता.
या मालिकेची नायिका मोनालीसा बागल सोबत लग्न केल्याचे असेच काही फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा त्यांच्या लग्नाच्या बातमीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. पण त्यानंतर हे प्रकरण अंगाशी आलंय समजताच त्यांनी मालिकेचे नाव जाहीर करण्याचे ठरवले. तेव्हा मात्र त्यांच्या लग्नाच्या बातमीवर उडालेला गोंधळ पाहून प्रेक्षकांमध्येही गोंधळ उडाला होता. १४ डिसेंबर ही तारीख त्यांनी जाहिर केल्यामुळे याच दिवशी त्यांचा कुठला नवा प्रोजेक्ट येतोय की काय? . पण आता किरणने शेअर केलेल्या डेटवर हे दोघे खरंच लग्न करोत! अशी एक भाबडी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.