झी वाहिनी वरील किचन कल्लाकर ह्या शो ने कमी दिवसातच चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. अनेक मराठी कलाकार ह्या शो मध्ये येऊन अस्सल मराठी पदार्थ तेही स्वतःच्या हाताने बनवण्याचा प्रयत्न करतात. अनेक कलाकार उत्तम पदार्थ बनवताना पाहायला मिळतात तर काही कलाकारांची चांगलीच धादळ उडताना पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी शो मधून काही काळ बाहेर गेलेल्या राजशेफ जयंती कठाळे ह्या पुन्हा शो मध्ये आलेल्या पाहायला मिळत आहेत. तर सूत्र संचालक संकर्षण कऱ्हाडे ह्याच्या जागी श्रेया बुगडे शो ची धुरा सांभाळताना पाहायला मिळत आहे.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ह्याच सूत्रसंचालन प्रेक्षकांना खूपच आवडलं होत त्याच्या शिवाय हा शो पाहायला खरी मजा येणार नाही असं अनेकांच मत आहे. पण संकर्षण हा काही भागांसाठीच पाहायला मिळणार नाही तो पुन्हा शो च सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे. उद्याच्या भागात आपल्याला ह्या शो मध्ये भाऊकदम त्याच्या आवडीचा पदार्थ करताना पाहायला मिळणार आहे. ह्या भागामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, गायिका कार्तिकी गायकवाड आणि भाऊ कदम हे खाद्य पकवान बनवताना पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हि पुरणाची करंजी बनवणार आहे तर कार्तिकी गायकवाड मटार कचोरी बनवणार आहे. अभिनेता भाऊ कदम हा दिवाळीचा सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजेच चकली बनवणार आहे. हे पदार्थ करताना त्याची कशी धादळ उडते हे पाहताना खूपच गम्मत येणार आहे. जेंव्हा भाजणीची ओळख अभिनेता भाऊ कदमांना राजशेफ जयंती कठाळे करून देतात तो सीन पाहायला खूपच मज्जा येणार आहे. पण राजशेफ जयंती कठाळे अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या कलाकारांना समजावून सांगून त्यांच्याकडून दिलेले पदार्थ चांगले बनवून घेतील अशी आशा आहे.

याच बरोबर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ह्याच्या जागी अभिनेत्री श्रेया बुगडे सूत्रसंचालन करताना ते कश्याप्रकारे करणार हे देखील समजणार आहे. ह्या पूर्वी देखील झी वाहिनीच्या अवॉर्ड शो चे सूत्रसंचालन तिने केले आहे. त्यामुळे तीदेखील प्रेक्षकांची मने जिंकेल अशी आशा आहे. काही दिवसानंतर पुन्हा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे शो च सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे. संकर्षण कऱ्हाडे मागच्या शो च्या शेवटी महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांची अनुमती मागत म्हणतो ” महाराज माझ्या घशात खवखव होत आहे. त्यामुळे मला काही दिवसांसाठी रजा हवी आहे. माझ्या जागी अभिनेत्री श्रेया बुगडे हि कार्यभार सांभाळेल तरी मला तुम्ही काही विश्रांतीसाठी रजा द्यावी” संकर्षणाच्या ह्या बोलण्यावर महाराज त्याला अनुमती देत त्यांनी अभिनेत्री श्रेया बुगडेला पुढे येणाऱ्या काही भागासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.