सारं काही तिच्यासाठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका .. तिच्याजागी या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री
कुठलीही मालिका ही त्या कलाकारांनी साकारलेल्या पात्रामुळे ओळखली जाते पण मालिकेत प्रमुख पात्रानेच एक्झिट घेतली तर मात्र तिथे प्रेक्षकांचा हिरमोड होतो. असाच काहीसा प्रकार सारं काही तुझ्यासाठी मालिकेत घडलेला पाहायला मिळणार आहे. झी मराठी वरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेत रंजक घडामोडी घडत आहेत. सर्वांचा विरोध असतानाही श्रीनू चारुसोबत लग्न करायला तयार झाला आहे पण यामुळे खोत कुटुंबात वादळ निर्माण झालं आहे. ओवी आणि श्रीनू दोघांचे एकमेकांवर प्रेम असूनही चारुच्या सांगण्यावरून श्रीनू तिच्याशी लग्न करायला तयार होतो पण यामुळे घरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्यात आता श्रीनू आजारी पडल्याने ओवीला त्याची काळजी वाटत आहे. दरम्यान या घडामोडी सुरू असताना मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
इतके दिवस खुशबू तावडे ने या मालिकेत उमाच्या भूमिकेने प्रेक्षकांना आपलेसे केले होते. पण आता खुशबू तावडेने मालिका सोडल्याचे समोर आले आहे. उमाच्या भूमिकेला खुशबुने रामराम ठोकला आहे त्यामुळे तिच्या भूमिकेत आता दुसरा चेहरा पाहायला मिळणार आहे. खुशबूने ही मालिका का सोडली यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तिच्याजागी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आल्याने प्रेक्षक नक्कीच नाराज होणार आहेत. पण असे असले तरी खूशबुच्या जागी आता अशीच एक दमदार अभिनेत्री उमाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जाते. ही अभिनेत्री आहे पल्लवी वैद्य. पल्लवी वैद्य ही आता सारं काही तिच्यासाठी या मालिकेत उमाची भूमिका साकारत आहे. पल्लवीने नुकतीच मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
याअगोदर पल्लवी वैद्य हिने तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत सकारात्मक भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती. मालिकेने एक्झिट घेतल्यानंतर पल्लवी आता झी मराठीवर झळकताना दिसणार आहे. पल्लवी ही तिच्या सहजसुंदर अभिनयाने उमाच्या भूमिकेला न्याय देईल असा विश्वास आहे. खुशबूने ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली असली तरी पल्लवी ही देखील उत्तम अभिनेत्री असल्याने ती प्रेक्षकांची निराशा करणार नाही. तूर्तास या भूमिकेसाठी पल्लवी वैद्य हिचे प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील.