साऊथ सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित Kgf २ हा दाक्षिणात्य चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणलेली पाहायला मिळाली. Kgf २ हा १०० कोटींचा बजेट असलेला चित्रपट आहे. १४ तारखेला या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर १३४.५ करोडचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी २७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १४५ कोटींचा गल्ला या चित्रपटाने आपल्या खात्यात जमा केला. Kgf हा पहिला सिजन २०१८ साली प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या दुसऱ्या सिजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट पाहून थिएटर बाहेर पडणारे प्रेक्षक आता तिसऱ्या सिजनची वाट पाहत आहेत.

संजय दत्तने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचा नायक रॉकी आणि अधिराच्या लढाईची ही कहाणी आहे. आपल्या खाणी परत मिळवण्यासाठी अधिरा रक्तपात करायला धजावत नाही. तिथेच त्याला साथ देणारा त्याचा पुतण्या म्हणजेच सुर्यवर्धनचा मुलगा ‘गरुड’ हा खलनायक सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे त्याला कारणही तसेच खास आहे. चित्रपटाच्या पहिल्या सिजनमध्ये गरूडच्या भूमिकेला चांगला वाव मिळाला होता. तर दुसऱ्या सिजनमध्येही त्याचा दरारा पाहायला मिळाला. मात्र चित्रपट मध्यावधीत असतानाच त्याचा अंत होतो. गरूडची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे रामचंद्र राजू. रामचंद्र राजू यशच्या जवळची एक खास व्यक्ती आहे. चित्रपटात येण्याअगोदर तो यशचा बॉडिगार्ड आणि त्याच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून ओळखला जात होता. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना रामचंद्र राजुने Kgf या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. त्यात त्याला गरूडची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

पहिल्याच चित्रपटामुळे रामचंद्र राजू प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करताना दिसला. त्याची भूमिका खलनायकाची जरी असली तरी ती तेवढ्याच ताकदीने त्याने ती निभावली आहे यामुळे त्याचे मोठे कौतुक झाले आहे. या चित्रपटा नंतर रामचंद्र ‘सुल्तान’, ‘मधगजा’, ‘वेत्री’, ‘जन गन मन’ और ‘बम्पर’ अशा चित्रपटातून काम करताना दिसला. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता तो यशचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर अशी ओळख न मिळवता एक अभिनेता म्हणून दाक्षिणात्य सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करत आहे त्यामुळे केवळ त्याचेच नाही तर सुपरस्टार यशचेही सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.