Breaking News
Home / जरा हटके / कच्चा बदाम फेम गायक भुवनला झाली दुखापत दवाखान्यात करावे लागले ऍडमिट

कच्चा बदाम फेम गायक भुवनला झाली दुखापत दवाखान्यात करावे लागले ऍडमिट

गेल्या काही वर्षात सोशलमीडियाने सर्वसामान्य कलाकारांना करोडो लोकांपर्यंत पोहोचवण्याची कमाल केली आहे. एका रात्रीत स्टार होणे म्हणजे काय असते याचा अनुभव आजपर्यंत अनेकांना आला आहे. असाच काहीसा अनुभव शेंगदाणे विकणाऱ्या भुवनला देखील आला आहे. सध्या सोशल मीडियावर भुवन बदायकर हे नाव आणि त्याचे कच्चा बदाम हे गाणे फक्त झळकतच नाही तर त्यावर लाखो रिल्स बनले जात आहेत .कच्चा बदाम गाण्यामुळे लोकप्रियता मिळवलेला भुवन बदयाकर मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हातात पुरेसे पैसे आल्याने भुवनने चार चाकी वाहन खरेदी केले आहे. त्यासाठी तो गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहे. सोमवारी गाडी चालवत असतानाच अपघात घडून आला.

bhuvan badaykar singer
bhuvan badaykar singer

या अपघातात भुवनला गंभीर दुखापत झाली असून पश्चिम बंगाल मधील विरभूम येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले आहे. भुवनच्या छातीला आणि डोक्याला जबरदस्त दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. अपघातानंतर भुवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याला डोक्याला दुखापत झाली असल्याचे दिसून येते. भुवन बाम हा गेली दहा वर्षे रोज सायकलवरून फिरत शेंगदाणे विकून दिवसाकाठी अडीचशे रूपये मिळवायचा. भुवनला गाणे म्हणत शेंगदाणे विकायची सवय होती. पश्चिम ब्ंगालमधील बीडहूम जिल्हय़ातील पुरालजुरी गावात बायको आणि तीन मुलांसोबत भुवन एका मातीच्या घरात राहतो. शेंगदाणे विक्री हाच त्याचा व्यवसाय आहे. ब्ंगालमध्ये शेंगदाण्यांना कच्चा बदाम म्हणतात. पोत्यातील कच्चा बदामाचे वर्णन करणारे एक पारंपरिक भाषेतील गाणे त्याने रचले आणि ते त्याच्या शैलीत म्हणत तो कच्चा बदाम विकत फिरायचा . त्यानंतर त्याचा हा व्हिडीओ एका जणाने सोशल मीडियावर टाकला. त्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत गेली. एका म्युझिक कंपनीने त्याच्या गाण्यावर रिमिक्स केले ज्यामध्ये भुवनही स्क्रिनवर दिसला.

kaccha badam singer bhuvan
kaccha badam singer bhuvan

दरम्यान सगळीकडे त्याच्या गाण्याची चलती सुरू झाली पण त्याला काहीच पैसे मिळाले नाहीत. ही गोष्टही त्याने सोशलमीडियावर व्हायरल केली होती तेव्हा त्या म्युझिक कंपनीने त्याला दीड लाखांचा पहिला चेक देऊ केला. इतकंच नाही तर आणखीन अनेक म्युजिक कंपनींकडून त्याला अनेक ऑफर मिळू लागल्या. गाणं सुपरहिट ठरल्यावर मी सेलिब्रिटी झालो आहे असा भुवन सांगू लागला. आता शेंगदाणे विकणे माझ्यासाठी अपमानास्पद आहे. मला आता मोठा कलाकार व्हायचे आहे. माझे गावकरी असं म्हणत आहेत की मला आता खूप लोक ओळखतात, त्यामुळे मी शेंगदाणे विकण्यासाठी बाहेर पडणे योग्य नाही. असे भुवनने एका मुलाखतीत म्हटले होते. थोड्याफार प्रसिद्धीला भुरळून जात भुवन आता चार चाकी वाहन खरेदी अधिक सोयीस्कर जीवन जगण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यात त्याच्या अपघाताच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.