जीव झाला येडा पिसा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहीली आहेत. मालिकेत शिवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका साकारली होती अभिनेत्री शर्वरी जोग हिने. शर्वरी जोग ही मूळची कोल्हापूरची. शाळेत असल्यापासूनच शर्वरी बालनाट्यातून काम करत होती. तिचे वडील नाट्य क्षेत्राशी निगडित होते त्यामुळे तिला अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती. मालिकेत येण्याअगोदर शर्वरीने प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकांमधून काम केलं होतं.

बीएस्सी ची पदवी मिळवलेल्या शर्वरीला पेंटिंगची आवड होती त्यासाठी कला निकेतनमधून तिने फाईन आर्टस् चे शिक्षण घेतले आहे. श्रावण क्वीन २०१८ कोल्हापूर मध्ये तीने बेस्ट परफॉर्मरचे पारितोषिक पटकावले होते. जीव झाला वेडा पिसा या मालिकेतील सोनीच्या भूमिकेने शर्वरीला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. विधिलिखित या वेबसिरीजमध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाली. सध्या सॅन मराठी वाहिनीवरील जाऊ नको दूर…बाबा या मालिकेतून ती अर्पिताच्या बहिणीची भूमिका निभावत आहे. शर्वरी जोग ही अभिनेता गौरव मालनकर याच्या प्रेमात आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्याच्यासोबत असलेल्या प्रेमाची कबुली तीने दिली आहे . गौरव मालनकर हा नाट्य तसेच मालिका अभिनेता आहे. झी युवा वरील फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेत त्याने भूमिका साकारली होती. गौरव मालनकर हा इंजिनिअरिंग शिकत असताना युथ फेस्टिव्हलमध्ये एकांकिका करण्यासाठी सहभागी झाला. मात्र पुढेही थेटर करायची ईच्छा व्यक्त केली होती. परंतु अभिनय क्षेत्रात येण्याला त्याच्या घरच्यांकडून विरोध होता. या काळातही त्याने पथनाट्य, एकांकिका आणि आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा गाजवल्या होत्या.

फुलपाखरू ही त्याने अभिनित केलेली पहिली टीव्ही मालिका ठरली या मालिकेत त्याने गौरवचीच भूमिका साकारली होती. त्यानंतर तू माझा सांगाती, साईबाबा श्रद्धा आणि सबुरी, दहा बाय दहा, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा मालिका, चित्रपट आणि व्यावसायिक नाटकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला. स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत त्याला जिवा महाला ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. गौरव अभिनेत्री शर्वरी जोग हिच्या प्रेमात आहे आणि तशी त्या दोघांनी प्रेमाची कबुलीही दिली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देत ” दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पुढच्या वर्षी तरी “आली माझ्या घरी ही दिवाळी” हे म्हणायची संधी मिळेल का? आणि पुढच्या दिवाळीला “एकाच फोटोत” मी कुर्त्यामध्ये आणि तु साडी मध्ये असण्याची आशा करायला हरकत नाही कारण तलाव पाळी ची मजा रंकाळ्यात नाही..” असं तो म्हणतो शर्वरीच्या भुऱ्या डोळ्यांनी त्याला पुरते घायाळ केले असल्याचे तो सांगतो. त्यावर त्याने शायरी अंदाजात एक पोस्ट देखील लिहिली आहे.