
जीव माझा गुंतला या कलर्स मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच ह्या मालिकेने प्रेक्षकांची माने जिंकलेली पाहायला मिळाली. रिक्षा चालवून स्वतःचे शिक्षण घेणारी अंतरा प्रेक्षकांच्या मनाला भावली आहे. या मालिकेतील मेघची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. मेघची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे “रौनाक शिंदे”. रौनक शिंदे हा मराठी मालिका अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.


अभिनेता रौनक शिंदेने या मालिकेसोबतच स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत काम केले आहे. अली आदिलशहा ही भूमिका तो त्यात साकारत आहे. रौनक शिंदेने नुकताच त्याची मैत्रीण प्राची मोरे हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. या दोघांची मागील ७ वर्षांपासूनची ओळख आहे. आता या ओळखीचे लवकरच लग्नात रूपांतर होणार आहे. प्राची मोरे ही बिजनेस वुमन आहे. प्राची मोरे ही प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. पाईनअँप्पल या स्टुडिओ अंतर्गत ती आपला व्यवसाय चालवत आहे. याशिवाय mommolates या चॉकलेट संबंधित आणि bombaymill या कपड्यांच्या ब्रँडशी ती जोडली गेली आहे. रौनकने जीव माझा गुंतला बरोबर जिजामाता मालिकेतदेखील छोटीसी भूमिका साकारली होती. अभिनेता रौनक आणि प्राची यांच्या साखरपुड्यानिमित्त या दोघांचेही खूप खूप अभिनंदन…