कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतील मल्हारच्या भूमिकेने सौरभ चौघुलेला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. सौरभ चौघुले हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या सौरभने कॉलेजमध्ये असताना नाटक एकांकिका केल्या. त्यानंतर त्याने मुंबईच्या दिशेने आपली पाऊले वळवली. इथे आल्यावर त्याने मॉडेलिंग क्षेत्रात आपले नशीब आजमावले. आर्थिक चणचण असल्याने त्याने सुरुवातीला फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले होते. हळूहळू या क्षेत्रात जम बसू लागल्यावर त्याने सिरीज आणि शॉर्टफिल्म दिग्दर्शित केल्या. मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारत असतानाच दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत त्याने विरोधी भूमिका साकारली या भूमिकेमुळे सौरभ प्रसिद्धीस आला.

जीव माझा गुंतला मालिकेत त्याला प्रथमच मुख्य नायकाची म्हणजेच मल्हारची भूमिका साकारण्याची नामी संधी मिळाली. मल्हार आणि अंतरा यांची मालिकेत जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. मालिकेमुळे सौरभ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. सेटवरील त्याचा बिनधास्तपणा सहकालाकारांचे नेहमीच मनोरंजन करताना दिसतो. याचमुळे सौरभ प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवत आहे. सौरभ त्याच्या गळ्यात एक पेंडंट घालतो. हे पेंडंट नेमके कशाचे आहे असा प्रश्न त्याला नेहमीच विचारण्यात येतो. या प्रश्नाचे उत्तर त्याने नुकतेच दिलेले आहे. सौरभ त्याच्या गळ्यात नेहमी आजोबांची सही असलेलं एक खास पेंडंट घालतो जे त्याला त्याच्या आईने गिफ्ट केलेलं आहे. सौरभच्या उजव्या हातावर देखील एक खास टॅटू काढण्यात आला आहे. हा टॅटू म्हणजेच त्याच्या आजोबांची सही आहे. सौरभच्या आजोबांचे निधन झाले आहे ते पोलीस खात्यात कार्यरत होते. सौरभ ३ वर्षांचा असल्यापासूनच ते त्यांच्यासोबत राहत होते. त्यांचे लाड शिव्या खात मी इथपर्यंत पोहोचलो असे तो आवर्जून सांगतो. त्यांनी दिलेली शिकवण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कामी आल्याचे तो म्हणतो. सर्वजण फादर्स डे निमित्त वाडीलांबद्दल लिहितात मात्र सौरभने आपल्या आजोबांना स्मरूण त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आज तुम्ही असता तर माझा नातू ह्या सिरीयल मध्ये आहे म्हणून गावभर फिरला असता तुमची उणीव कायम जाणवते मात्र तुम्ही अजूनही माझ्या सोबत आहात असे तो आवर्जून सांगतो. जेव्हा जेव्हा माझ्याकडे कोणत्याही परिस्थितीची उत्तरं नसतात तेव्हा मी माझ्या हातावरची तुमची स्वाक्षरी (टॅटू) पाहतो आणि मला जाणवते की तुम्ही माझा हात धरला आहे. त्याद्वारे मला मार्गदर्शन करत आहात. नशीबवान होतो की तुम्ही खूप काही शिकवलं आज आयुष्यात तीच शिकवण घेऊन पुढे जातोय. माणसं, नाती आयुष्यात किती महत्त्वाची असतात ते शिकलो. आजपण कायम तुमचे पाया पडून कामाला सुरुवात करतो आशीर्वाद तर कायम आहेतच पण तुम्ही शिकवलेल्या काही गोष्टी आजपण मी माझ्या सोबत घेऊन चालतो. मम्मीला माहितीये की तुम्ही आमच्या किती जवळ आहेत म्हणून तिने हे पेंडंट बनवून दिलं.