‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेतील कलाकारांमध्ये सध्या हर्ष आणि उत्साहाच वातावरण पसरलं आहे. ज्याचं कारण आहे या मालिकेतील एका अभिनेत्रीच लग्न. अभिनेत्री पूजा रायबागी ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिने या विषयीची माहिती चाहत्यांना दिली. पुजाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्री वेडिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक जण तिच्या लग्नाच्या तरखेविषई चर्चा करताना दिसत आहेत. पूजा ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेमध्ये कलिंदीचे पात्र साकारते.

यामध्ये कायमच ती चांदुलीला त्रास देण्याची एकही संधी न सोडताना दिसते. जय जय स्वामी समर्थ ही मालिका अध्यात्म आणि स्वामींवर आधारित आहे. त्यामुळे ही मालिका पाहणाऱ्यांचा एक वेगळाच दृष्टिकोन बनलेला आहे. त्यामुळे कलिंदीचे पात्र साकारत असताना पुजाला नेहमीच प्रेक्षकांच्या रागाला सामोरे जावे लागते. मात्र एक अभिनय आणि कलाकार या दृष्टीने पाहिलं गेलं तर, पूजासाठी तिच्या कामाची हीच खरी पोच पावती आहे. पूजा अभिनेता प्रसाद दाबकेबरोबर विवाह बंधनात अडकणार आहे. २८ डिसेंबर २०२१ रोजी या दोघांनी आपला साखरपुडा उरकला होता. या दोघांच्याही अभिनयातील कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास पुजाला लहानणापासूनच अभिनयाची आवड असल्याने तिने सुरुवातीला अनेक नाटकांमधून अभिनयाचे धडे गिरवले. अशात ‘तांडव’ या चित्रपटात तिला पोलीस आधिकरी कीर्ती पाटील हे बेधडक आणि निर्भिड पात्र साकारण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोनं करत तिने यामध्ये दमदार अभिनय केला. या चित्रपटासाठी तिने घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, लाठीकाठीचे महिनाभर प्रशिक्षण घेतले होते.

‘यदा कदाचित’, ‘खळी’, ‘कानांची घडी तोंडावर बोट’, ‘ललित २०५’, ‘झुंड’ ‘असंही होतं कधी कधी’, ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकातून आणि मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पुजाने तिचे प्री वेडिंगचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “चार दिवसांनंतर” आता लवकरच अभिनेत्री प्रसादबरोबर विवाह करणार आहे. प्रसाद हा देखील एक अभिनेता असून त्याने ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका आपल्या अभिनयाने चांगलीच गाजवली. यामध्ये तो गोपीनाथ पंथांच्या भूमिकेत दिसला होता. तसेच ‘सिंधू’ या मालिकेत देखील त्याने गंगाधर अष्टपुत्रेची भूमिका रंगवली आहे. प्रसाद विषयी विशेष सांगायचे झाल्यास त्याला फोटोग्राफीचा आणि चित्रकलेची आवड आहे. मराठी रंगभमीवरील हे दोन्ही कलाकार आता लवकरच विवाहबध्द होणार असल्याने सोशल मीडियावर यांच्याच लग्नाची चर्चा रंगली आहे.